ट्रिपल सीट, स्टंटबाजी व रॅश ड्रायव्हिंगवर चंद्रपूर पोलिसांची विशेष मोहीम

January 17, 2026 by Prakash Hande

New Year Traffic Safety : चंद्रपूर - २७ डिसेंबर २०२५ - ३१ डिसेंबर रोजी वर्ष समाप्ती व नववर्षाचे स्वागत नागरिक जल्लोषात करतात मात्र हे करीत असताना तरुणाई मद्यप्राशन करीत आपला अतिउत्साह दुचाकी व चारचाकी वाहने भरधाव वेगात चालवून दाखवितात. तरुणाईच्या अतिउत्साहीपणावर आळा घालण्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यात २८ डिसेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत ठिकठिकाणी नाकेबंदी लावण्यात येणार आहे. (आम आदमी पार्टीने चंद्रपूर मनपा निवडणुकीसाठी १० उमेदवारांची यादी केली जाहीर)

नवीन वर्षाचे स्वागत करीत असताना तरुणाई मद्य प्राशन करीत रस्त्यावर वाहने अतिवेगात बेदरकारपणे चालवीत इतर नागरिक सह स्वतःचा जीव धोक्यात टाकतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गंभीर अपघात होतो, या घटनांमुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे चंद्रपूर पोलिसांनी नागरिकांना सूचित केले आहे कि मद्य प्राशन करून वाहन चालविताना कुणी आढळल्यास कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत नाकेबंदी करीत ड्रंक अँड ड्राइव्ह, ट्रिपल सीट, रॅश ड्राइविंग व स्टंटबाजी करून वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध कठोर कारवाई होणार आहे.

याकरिता नागरिकांनी नवं वर्षाचे स्वागत करताना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी केले आहे.

Leave a Comment

+