ST reservation protest police injured । आदिवासी समाजाच्या मोर्च्याला गालबोट, पोलीस जखमी,५ जणांवर गुन्हे दाखल

January 17, 2026 by Prakash Hande

ST reservation protest police injured

ST reservation protest police injured : राजुरा: बंजारा समाजाला आदिवासी आरक्षणामध्ये (ST Reservation) समाविष्ट करू नये, या मागणीसाठी आदिवासी समाजातर्फे राजुरा शहरात २७ सप्टेंबर रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. भर पावसात निघालेला हा मोर्चा कर्नल चौकातून नाका नंबर तीन मार्गे तहसील कार्यालयात पोहोचला. मात्र, निवेदन दिल्यानंतर झालेल्या गोंधळामुळे या शांततापूर्ण मोर्चाला अचानक गालबोट लागले आणि परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली.

ताडोबा जंगल सफारी च्या शुल्काबाबत व्यवस्थापनाने दिले स्पष्टीकरण

नेमकी काय घडली घटना?

तहसील कार्यालयात निवेदन दिल्यानंतर काही मोर्चेकरी कार्यालयासमोर उभ्या असलेल्या ट्रकवर चढले. त्यांना खाली उतरवण्यासाठी राजुरा पोलीस निरीक्षक सुमित परतेकी आणि इतर कर्मचारी गेले असता, जमावाकडून अचानक दगडफेक सुरू झाली. Rajura Banjara ST reservation protest

या दगडफेकीत पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या नाकावर दगड लागल्याने ते गंभीर जखमी झाले आणि त्यांना उपचारासाठी तातडीने हलवण्यात आले. त्यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक हेमंत पवार, पोलीस कर्मचारी संदीप बुरडकर आणि वेंकटेश भटलांगे हे तिघेही जखमी झाले.

परिस्थिती हाताळण्यासाठी आणि जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. ही अनुचित घटना २७ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे ४:३० वाजताच्या सुमारास घडली. police action on Banjara reservation protest

पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. बेकायदेशीर जमाव करणे, पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करणे, पोलिसांवर दगडफेक करून जखमी करणे आणि सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, या आरोपांखाली पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:

  1. गणेश म्हरसकोल्हे (३०)
  2. शुभम पेंदोर (२५)
  3. विनोद पेंदोर (२५)
  4. अमोल रामू मडावी (सर्व रा. पाचगाव)
  5. अरुण विठ्ठल मंडाळी (रा. जामनी, ता. कोरपना)

यांच्यासह इतर आठ ते दहा अज्ञात आरोपी आहेत.

कलमांनुसार गुन्हा दाखल:

आरोपींविरुद्ध भादंवि कलम १८९(१), १९१(१), १९०, १३२, १२१(१), १२६(२), ११८(१), २२३ (यामध्ये प्रामुख्याने बेकायदेशीर जमाव, आदेशाचे उल्लंघन आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला/अडथळा आणणे यांचा समावेश आहे) या कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सर्व आरोपींना राजुरा येथील न्यायालयात हजर करण्यात आले आहे. पुढील तपास राजुरा पोलीस करत आहेत.

नेते बापूराव मडावी यांची प्रतिक्रिया:

आरक्षण बचाव कृती समितीचे संयोजक तथा आदिवासी नेते बापूराव मडावी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "हा मोर्चा अतिशय नियोजनबद्ध आणि न्यायिक मागण्या घेऊन शांततेत निघाला होता. निवेदन देण्यासाठी आम्ही तहसीलदार यांच्याकडे गेलो असताना हा अनुचित आणि निंदनीय प्रकार घडला. आदिवासी समाजाच्या मोर्चाला गालबोट लागणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेतली होती, परंतु हा प्रकार आमच्या नकळत घडला. या संपूर्ण घटनेची आम्ही सखोल चौकशी करू. पोलीस आणि समाजबांधव यांच्या भूमिका समजून घेतली जाईल."

Leave a Comment

+