Chandrapur OBC leaders statements : चंद्रपुर २१ सप्टेंबर २०२५ - महाराष्ट्र शासनाने 2 सप्टेंबर 2025 रोजी काढलेल्या शासन निर्णयामुळे व हैद्राबाद गॅझेटियर लागू केल्यामुळे ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागला नाही असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस वारंवार सांगत असले तरी ओबीसी नेते व शासनातील मंत्री आरक्षणाला मोठा धक्का लागल्याचे सांगत आहे तर तिकडे मनोज जरांगे पाटील गुलाल उधळून मराठा जिंकल्याचे सांगत आहे यामुळे ओबीसी समाज द्विधा मनस्थिती मध्ये असून पुरता घाबरलेला आहे. Maharashtra OBC reservation 2025
आदिवासी शेतमजुरांची फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा - पालकमंत्री उईके
खरे तर हैद्राबाद गॅझेटियर मध्ये सामूहिक नोंदी आहे, वैयक्तिक नोंदी नाही आणि कुणबी प्रमाणपत्र वैयक्तिक नोंदी शिवाय देता येत नाही असे असताना सुद्धा 17 सप्टेंबर पासून मराठवाड्यातील हिंगोली, धाराशिव व बीड येथे हैद्राबाद गॅझेटियर वरून कुणबी प्रमाणपत्र वाटल्याचे वेगवेगळे चॅनलवरून सांगितल्या जात आहे त्यामुळे ओबीसी समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या संदर्भातील खालील मागण्याकडे आपण जातीने लक्ष देऊन त्या अमलात आणाव्यात या करिता राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे तर्फे महसुल मंत्री बावनकुळे यांना निवेदना द्वारे खालील मागण्या करण्यात आल्या आहे.
निवेदन देतांना ओबिसी योद्धे रवींद्र टोंगे, मनिषा बोबडे, महासचिव महिला महासंघ, किसान महासंघाचे रणजीत डवरे, धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष श्रीधर मालेकर , सचिव अतुल देऊळकर त्यांचे सर्व संचालक मंडळ सोबत, ओबीसी विध्यार्थी महासंघाचे दिपक पिंपळशेंडे, सुमित देवाळकर, प्रशांत पिंपळशेंडे, उदय टोंगे,सूरज देवाळकर, उमेश श्रीरसागर, चंद्रशेखर देवाळकर, हर्षल टोंगे उपस्थित होते.
Leave a Comment