chandrapur satta matka । चंद्रपूर रामनगर पोलीसांची सट्टा मटकावर कारवाई, प्रियदर्शिनी चौकात सुरु असलेल्या सट्ट्याला अभय कुणाचे?

April 10, 2026 by Prakash Hande

chandrapur satta matka : चंद्रपूर - शहरातील रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरु असलेल्या सट्टा पट्टीवर रामनगर पोलिसांनी ९ एप्रिल रोजी कारवाई केली, मात्र प्रियदर्शिनी चौकात खुलेआम सुरु असलेला सट्टा अद्यापही पोलिसांना दिसला नाही याचे आश्चर्यचं आहे. (जेवणाचं आमिष आणि दुचाकी लंपास केली)

 

९ एप्रिल रोजी रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत लघु उद्योग भवन जवळील निंबाच्या झाडाखाली एक इसम सट्ट्याचे क्रमांक लावत नागरिकांकडून पैसे घेत होता. सदरची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी धाड मारली असता २८ वर्षीय संदेश दिलीप फुलझेले राहणार जलनगर वॉर्ड याला ताब्यात घेण्यात आले. 

 

फुलझेले ची अंगझडती घेतली असता मधुर नाईट, मिलन नाईट व श्रीदेवी नाईट अश्या चिठ्ठया आढळून आल्या, फुलझेले हा कागदावर आकडे लिहत नागरिकांकडून पैसे घेत सट्टा लावत होता. पोलिसांनी यावेळी ४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. फुलझेले वर पोलिसांनी महाराष्ट्र जुगार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

 

शहरातील गजबजलेल्या प्रियदर्शिनी चौकात खुलेआम सट्टा मोठ्या प्रमाणात व निवांतपणे घेतल्या जातो, त्याची माहिती रामनगर पोलिसाना कधी मिळणार? जिल्हाधिकारी, न्यायाधीश, मंत्री याच मार्गावरून जात असतात. तरीही तो सट्टा पोलीस प्रशासनाला न जुमानता सलग सुरु आहे. हे विशेष.

 

Leave a Comment

+