Human Wildlife Conflict : चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्या मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला असून २८ फेब्रुवारीला वाघाने दोघांची शिकार केल्याची घटना घडली. मूल तालुक्यातील सोमनाथ व मोहर्ली वनपरिक्षेत्रात या घटना घडल्या असून २ महिन्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात एकूण ६ नागरिकांचा बळी गेला आहे ज्यामध्ये ५ वाघाच्या तर एक बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. (३ दिवसापासून बेपत्ता महिलेची वाघाने केली शिकार)
मूल तालुक्यातील सोमनाथ प्रकल्पातील गट क्रमांक २६१ मधील शेतशिवारात सकाळी ८ वाजताच्या दरम्यान ४३ वर्षीय सुनीता शामराव भोयर राहणार आदर्शखेडा मारोडा या कापूस वेचायला गेल्या होत्या, यावेळी त्यांच्यासोबत इतर मजूरही होते. कापूस वेचणी सुरु असताना झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने सुनीता वर हल्ला केला, मजुरांच्या समोर वाघ सुनीता ला ओढत होता, मजुरांनी आरडाओरडा केला मात्र तोपर्यंत सुनीता चा मृत्यू झाला. आरडाओरडा झाल्याने वाघ जा जंगलाच्या दिशेने पळाला.
सुनीता भोयर हि दिव्यांग असल्याने ती आई-वडिलांकडे राहत होती, या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करीत वाघाचा बंदोबस्त करावा व मृतक सुनीताच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली मागणी जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत सुनीताचा मृतदेह आम्ही उचलू देणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली.
तब्बल ४ तासानंतर वनविभागाने मागण्या मान्य केल्या, मृतकाच्या कुटुंबाला ५० हजार रुपयांची मदत देण्यात आली.
दुसऱ्या घटनेत ताडोब्यातील मोहर्ली वनपरिक्षेत्रातील पद्मापूर बीटात ६० वर्षीय काशिनाथ शिवराम लोनबले हे २७ फेब्रुवारीला कक्ष क्रमांक १७९ मध्ये जळाऊ लाकूड तोडण्यासाठी गेले होते, त्यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने काशिनाथ यांच्यावर हल्ला करीत ठार केले, काशिनाथ घरी न आल्याने त्यांच्या भावाने शोध घेतला मात्र ते मिळून न आल्याने वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत शोधमोहीम राबवली असता एका नाल्याजवळ काशिनाथ यांचा मृतदेह आढळला.
मृतकाच्या नातेवाईकांना यावेळी वनविभागातर्फे ५० हजारांची आर्थिक मदत देण्यात आली, त्या परिसरात वनविभागाने ट्रॅप कॅमेरे लावले आहे. आगामी काही दिवसात मानव वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
Leave a Comment