पुरग्रस्तांसोबत संवाद साधण्यासाठी पालकमंत्री उशीरा पोहचले

News34

चंद्रपूर – चंद्रपूर शहरात मागील वर्षीपासून पावसाळ्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण व्हायला लागली आहे, मात्र या पूर परिस्थिती वर अद्याप तोडगा निघाला नाही, आज पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा नियोजन भवनात पूरग्रस्तांसोबत संवाद व त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बोलाविले होते मात्र पालकमंत्री मुनगंटीवार हे स्वतः त्या बैठकीला उशिरा पोहचल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

शहरात येणाऱ्या पुरावर जनप्रतिनिधी व प्रशासन कायमचा तोडगा काढण्यास अपयशी ठरले आहे, दरवर्षी पाऊस पडला की शहरातील अनेक भागातील घरे पाण्याखाली जातात.

आजही काही पूरग्रस्त नागरिकांना मदत मिळत नसल्याची माहिती आहे, पुरग्रस्तांच्या समस्या काय आहे? हे जाणून घेण्यासाठी जिल्हा नियोजन भवन येथे पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पूरग्रस्तांची बैठक आयोजित केली होती.

सायंकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत ही बैठक होणार होती, मात्र पालकमंत्री स्वतः 7 वाजताच्या दरम्यान पोहचले, नागरिक कामावर न जाता पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या समक्ष आपल्या समस्या विस्तृत मांडणार होते मात्र मंत्री महोदय उशिरा आले.

त्यानंतर पालकमंत्री यांनी सर्वांच्या समस्या ऐकुन घेतल्या मात्र बैठकीला उशीर झाल्याने नागरिक संतापले, कारण पुरग्रस्तांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती, त्यामुळे सविस्तर समस्या कुणी सांगू शकले नाही.

दरवर्षी पुर येतं आहे, त्यावर प्रशासन व जनप्रतिनिधीं यांनी कायमचा तोडगा काढावा, अन्यथा दरवर्षी फक्त प्रशासन पंचनामे करणार आणि मदत देणार असे किती दिवस चालणार असा प्रश्न पूरग्रस्त नागरिकांनी उपस्थित केला.

 

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!