पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी कधी? – महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचा सवाल

News34

चंद्रपुर : पाचोरा जिल्हा जळगाव येथील पत्रकार संदीप महाजन यांना मारहाणप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ जिल्हा चंद्रपुरच्या वतीने नुकतेच जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने पत्रकार संरक्षणार्थ संरक्षण कायदा अंमलात आणला व देशातील लोकशाहीतील चौथा स्तंभ म्हणून माध्यमांना महत्त्वाचे स्थान दिल्या गेले आहे. परंतु पत्रकार संरक्षण कायद्याचे पालन होताना दिसत नाही. याचे ज्वलंत  उदाहरण नुकतेच जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील एका स्थानिक आमदार किशोर पाटील यांनी साथीदारांना पाठवून संदीप महाजन यांना शहीद महाजन चौकात बेदम मारहाण करण्यात आली, यापूर्वी
सुद्धा देशात व महाराष्ट्रात पत्रकारांवर जीवघेणे हल्ले झालेले आहे.
 सदर घटनेचा निषेध कण्यासाठी तसेच दोषींवर कडक कारवाई करण्यासाठी नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.  निवेदन देताना प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश सोलापन, उपाध्यक्ष अनिल देठे, महासचिव पुरुषोत्तम चौधरी,सचिव विनोद पन्नासे, कोषाध्यक्ष प्रकाश हांडे, मार्गदर्शक धर्मेश निकोसे, सहसचिव प्रभाकर आवारी व प्रसिद्धी प्रमुख धनराज कोवे यांची उपस्थिती होती.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!