Eco Pro : इको प्रो तर्फे लोहारा-मामला जंगलातील अदानी गो बॅक आंदोलनाचे प्रतीक वृक्षांना बांधल्या राख्या

Eco Pro चंद्रपूर: इको-प्रो तर्फे लोहारा-मामला जंगलातील वृक्षांना राखी बांधुन, युवकांनी वन-वन्यजीव तसेच पर्यावरणाच्या संरक्षणसाठी सदैव तत्पर राहावे, पर्यावरण संरक्षणाकरिता कटिबध्द राहावे असा संदेश कार्यक्रमातुन मान्यवरांनी दिला.

घरकुल : चंद्रपूर जिल्ह्यात 864 घरकुल मंजूर

Eco pro आज लोहारा-मामला वनक्षेत्रातील ‘अदानी गो बॅक’ आंदोलनाचे प्रतिक असलेल्या वृक्षांना राखी बांधुन वृक्षरक्षाबंधन कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे यंदाही विविध महाविद्यालय एकत्रीत येत आयोजन करण्यात आले. यामध्ये एफईएस गर्ल्स महाविदयालय, सरदार पटेल महाविद्यालय, खत्री महाविद्यालय सहभागी झाले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सचिन शिंदे, विभागीय वन अधिकारी, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, बापू येडे, उपसंचालक, सामाजिक वनीकरण, सेवानिवृत्त विभागीय वनाधिकारी अभय बडकेलवार, इको-प्रोचे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी उपस्थित विद्यार्थाना मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. डाॅ. राजेंद्र बारसागडे, प्रा. डाॅ. मेघमाला मेश्राम, डॉ कुलदीप गोंड, प्रा डॉ निखिल देशमुख, प्रा डॉ संतोष कावरे, प्रा रवी कावळे, प्रा डॉ माधव गुरनुले उपस्थित होते.

Eco pro चंद्रपूर जिल्हा जंगलाचा जिल्हा असुन ‘वाघांचा जिल्हा’ ही नवी ओळख निर्माण झालेली आहे. या जिल्हयात वन-वन्यजिव या नैसर्गिक संपेदसह मोठया प्रमाणात खनिज संपत्ती सुध्दा आहे. जंगलाखाली असलेल्या कोळसामुळे येथील वन्यजीव समृध्द जंगलावर कोळसा खान प्रकल्पाचे संकट नेहमीच उभे राहते. आणी प्रश्न उभा राहतो तो येथील पर्यावरणाचा, प्रदूषणाचा, वाघासह अन्य वन्यप्राण्यांचा अधिवासाचा, त्यांच्या भ्रमणमार्गाचा, अपुऱ्या अधिवासामुळे मानव-वन्यप्राणी संघर्ष वाढीचा म्हणुन येथील वन-वन्यजिवांच्या संरक्षण व संवर्धनासाठी चंद्रपूरकर नागरीकांना सदैव तत्पर राहीले पाहीजे. इको-प्रो सह अनेक पर्यावरणवादी संस्था-संघटनाच्या तसेच चंद्रपूरकरांच्या जनआंदोलनामुळे प्रस्तावीत अदानी कोळसा खानीचा प्रस्ताव नाकारला गेला होता. या आंदोलनाच्या स्मृती जपत, आपला नैसर्गीक वारसा पुढील पिढीला सुस्थितीत हस्तांतरण करता यावे, याची जाणीवजागृती सर्व घटकामध्ये यावी याकरिता दरवर्षी ‘इतिहासात डोकावुन, भविष्यातील पर्यावरणाची सुरक्षीतता करीता लढण्यास बळ मिळावे’ हा उद्देश लक्षात घेउन इको-प्रो संस्थेच्या वतीने मागील 16 वर्ष पासुन लोहारा-मामला जंगलातील ‘अदाणी गो बॅक’ आंदोलनाचे प्रतिक असलेल्या वृक्षास राखी बांधुन चंद्रपूर शहरात वन-वन्यजीव व पर्यावरण रक्षणासाठी 2009 साली प्रस्तावीत अदाणी कोळसा खाणीच्या विरोधात झालेल्या जन-आंदोलनाच्या स्मृतीना उजाळा दिला जातो.

Eco pro या कार्यक्रमा दरम्यान लोहारा-मामला रोडवरील वनक्षेत्रातील ‘अदाणी गो बॅक’ आदोलनाचे प्रतीक असलेल्या वृक्षास राखी बांधण्यात आली. निसर्गाचे रक्षण करण्यास वनविभागासोबतच सामान्य नागरीक व गावकरी यांचे सुध्दा सहकार्य अपेक्षीत असुन आपल्या अवतीभवतीचे पर्यावरण व जैवविवीधतेच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असले पाहीजे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करीत स्मृतीना उजाळा दिला. विविध महाविद्यालयाचे विद्यार्थ्यासह वनपाल उत्तम गाठले, वनरक्षक स्मिता पाटील, रीना उईके, इको-प्रो भद्रावती चे संदीप जीवने, संतोष रामटेके, किशोर खंडाळकर, अमोल दौलतकर, इको-प्रो पर्यावरण विभाग प्रमुख नितीन रामटेके, अब्दुल जावेद, राजू काहिलकर, सुनील लिपटे, योजना धोतरे, सनी दुर्गे, सचिन धोतरे, रुद्राक्ष धोतरे, चित्राक्ष धोतरे आदी उपस्थित होते.


आजच्या कार्यक्रमाचे औचित्य साधत इको-प्रो तर्फे भद्रावती येथील इको-प्रो चे जेष्ठ सदस्य किशोर खंडाळकर यांना उपस्थित मान्यवर विभागीय वन अधिकारी सचिन शिंदे, बापू येडे यांचे हस्ते वन्यजीव संरक्षण विभाग च्या ‘जीवरक्षा’ संदर्भात केलेल्या उल्लेखनिय कार्यासाठी ‘इको-प्रो कार्यकर्ता सन्मान’ पुरस्कार देण्यात आला. नुकतेच खंडाळकर यांनी 45 फूट उंचीवर हायमास्ट लाईटला पतंग धागा मध्ये अडकलेल्या पक्षाची सुखरूप सुटका केली होती.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!