Mns mahila aghadi : नागभीड अत्याचार प्रकरणात मनसे महिला सेनेचे निवेदन

mns mahila aghadi वेडसर महिलेवर बलात्कार करून चित्रफित प्रसारमाध्यमावर प्रसारित करणार्या त्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या

चंद्रपूर:-राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण जास्त वाढले असून महिलांना घराबाहेर पडने देखील धोक्याचे झाले आहे. मानवतेला काळीमा फासणारी घटना बदलापूर येथे नुकतीच घडली या घटणेनी संपूर्ण राज्य हादरला सर्वत्र निषेध व आक्रोश सूरू असतांनाच परत काहि दिवसांपूर्वी नागभीड येथील एका मानसिक रुग्न असलेल्या महिलेंवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली.

आरोग्य : घुग्गुस येथे डेंग्यू चा धोका वाढला

महिला अत्याचाराची धग चंद्रपूर जिल्ह्यात पोहचल्याने आता महिला असुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली आहे, या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी मनसे महिला आघाडीतर्फे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांना निवेदनामार्फत करण्यात आली.

Mns mahila aghadi नागभीड सामूहिक अत्याचार प्रकरणात आरोपी इथवर थांबले नाही तर त्यांनी त्या घटनेची चित्रफीत बनवीत समाजमाध्यमांवर व्हायरल सुद्धा केली, असा विकृतपणा द्या आरोपींच्या मनात भरला होता, अश्या विकृत मानसिकता असलेल्या आरोपीना कठोर शासन व्हावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

गुन्हेगारी : खर्ऱ्याची उधारी दिली नाही म्हणून पान ठेला चालकाने अल्पवयीन मुलीचे केले लैंगिक शोषण

Mns mahila aghadi नागभीड ची घटना समाजमन सुन्न करणारी होती, आपण या गुन्हेगाराविरुद्ध कठोर कारवाई करून यांना फासावर चढवावे ज्यामुळे अशा घटना पून्हा घडणार नाहीत आणि कुणी राक्षसीवृत्ती हिम्मत देखील करणार नाही यावर लवकरात लवकर ठोस पाउले उचलावी अन्यथा मनसे महिला सेना आक्रमक आंदोलन करणार या आशयाचे निवेदन मनसेच्या महिला सेना चंद्रपूर माजी जिल्हाध्यक्षा सौ. सूनिता गायकवाड ,मनसेचे जिल्हासचिव (बल्लारपूर विधानसभा) मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदिप चंदनखेडे यांच्या नेतृत्वात मनसे महिलासेनेच्या बल्लारपूर तालुका अध्यक्षा सौ. कल्पना पोर्तलावार यांनी पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना दिले असून निवेदन देणार्या शिष्टमंडळात मनसेचे शुभम वांढरे, मंगेश धोटे, अर्चना आमटे, राज वर्मा, कुंताताई येरमुडे, सरला दुर्गे, निक्की यादव, उज्वल तेलतुमडे तथा मनसेचे कार्यकर्ते व मनसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!