social activities : जय श्रीराम बाल गणेश मंडळाचा सामाजिक उपक्रम

social activities चिमूर – नुकतेच पहिल्या गणपतीचे विसर्जन पूर्ण झाले असून आता मस्कऱ्या गणपतीच्या स्थापनेला सुरुवात झाली असून जय श्रीराम बाल गणेश मंडळ टिळक वॉर्ड चिमूर येथील गणेश मंडळाच्या वतीने अंध. अपंग. व मुक बधीर विद्यार्थ्यांचे हस्ते गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.


social activities टिळक वॉर्ड चिमूर येथील जय श्रीराम बाल गणेश मंडळ नेहमी सामाजिक उपक्रम राबविण्यात व अग्रेसर असते. वैराग्यमूर्ती गाडगे बाबा यांचे विचार या मंडळाच्या पदाधीकऱ्यानी अंगीकरल्याने नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबविल्या जातात. दिनांक 21 सप्टेंबर रोजी गणेश मूर्तीची स्थापना असल्याने गणेश मूर्ती बंडी बैल सज्ऊन अगदी साध्या पद्धतीने मूर्ती मंडपात आणण्यात आली.

तर चंद्रपूर जिल्ह्यात मोठं जनआंदोलन होणार – डॉ.अभिलाषा गावतुरे

मूर्तीची विधिवत पूजा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मुक बधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हस्ते करून गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना व आरती त्यांच्या हस्ते करण्यात आली. आरती नंतर विद्यार्थ्यांना भोजन दान करून त्यांना भेट वस्तू देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मुक बधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास कामडी सहित सर्व कर्मचारी व जय श्री राम बाल गणेश मंडळ टिळक वॉर्ड चिमूर येथील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!