BJP candidate : भाजपचे 2 उमेदवार जाहीर 4 वेटिंगवर

BJP candidate 20 ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पक्षाने आगामी विधानसभा 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, या यादीत चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर व बल्लारपूर या 2 विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे.
उर्वरित 4 विधानसभा क्षेत्रातील उमेदवारीवर अजूनही सस्पेन्स कायम आहे.


BJP candidate राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे, मात्र काही जागेवर तेच उमेदवार तर काही जागांवर मेरिट नुसार उमेदवारी देण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 6 विधानसभा पैकी 3 कांग्रेस 2 भाजप व 1 जागा अपक्षाकडे आहे. BJP candidate

महत्त्वाचे : निराधारांचा आधार अम्मा चं निधन


वर्ष 2019 च्या विधानसभा निवडणुकीत चंद्रपूर मधून अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी विजय मिळविला होता.
किशोर जोरगेवार यांना 1 लाख 17 हजार 570 मते मिळाली होती तर भाजपचे नाना शामकुळे यांना 44 हजार 909 मते मिळाली.


राजुरा विधानसभा क्षेत्रात कांग्रेसचे सुभाष धोटे यांना 60 हजार 228 तर शेतकरी संघटनेचे वामनराव चटप यांना 57 हजार 727 मते मिळाली.
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांना 86 हजार 2 मते तर कांग्रेसचे डॉ विश्वास झाडे यांना 52 हजार 762 मते मिळाली होती. BJP candidate


ब्रह्मपुरी मतदार संघातून कांग्रेसचे विजय वडेट्टीवार यांना 96 हजार 726 मते तर शिवसेना पक्षाचे संदीप गड्डमवार 78 हजार 177 मते मिळाली, वरोरा विधानसभा मतदार संघातून कांग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांना 63 हजार 862 तर भाजपचे संजय देवतळे यांना 53 हजार 665 मते मिळाली. चिमूर मतदार संघातून भाजपचे बंटी भांगडिया यांना 87 हजार 146 मते तर कांग्रेसचे सतीश वारजूरकर यांना 77 हजार 394 मते मिळाली होती.


चिमूर मतदार संघातील भाजप आमदार बंटी भांगडिया हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू व खंदे समर्थक आहे, त्यामुळे यंदा त्यांना विजयाची हॅट्रिक साधण्याची संधी भाजपने दिलेली आहे. BJP candidate


सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यात केलेला विकास व राज्यात आपल्या मंत्रालयात केलेल्या उत्कृष्ट कार्यामुळे पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवीत संधी दिली आहे.
चंद्रपूर विधानसभा मतदार संघात भाजपने उमेदवार जाहीर केला नसून विद्यमान आमदार काय भूमिका घेतात ते कोणत्या पक्षातून निवडणूक लढणार अशी वाट भाजप पक्ष पाहत आहे, वेळेवर भाजप आयात उमेदवाराला संधी देऊ शकतो.


वरोरा मतदार संघात भाजप पक्षाकडून इच्छुकांची गर्दी आहे बंडखोरी होऊ नये यासाठी भाजपने अद्यापही उमेदवारी जाहीर केली नाही.
राजुरा मतदार संघ हा कांग्रेसचे बालेकिल्ला आहे सध्या भाजप कडून देवराव भोंगळे, माजी आमदार संजय धोटे व माजी आमदार सुदर्शन निमकर यांची नावे चर्चेत आहे. याठिकाणी सुद्धा भाजपला बंडखोरीची शक्यता वाटत असल्याने उमेदवार जाहीर केला नाही.


ब्रह्मपुरी मतदार संघात कांग्रेसचे विजय वडेट्टीवार हे बलाढ्य उमेदवार आहे त्यांच्यासमोर अजूनही भाजप पक्षाने उमेदवार जाहीर केलेला नाही, ब्रह्मपुरी विधानसभेत वडेट्टीवार यांच्या तोडीतला उमेदवार अद्याप भाजपला मिळालेला नाही.

एकूण मतदार किती?
राजुरा मतदार संघात 3 लाख 24 हजार 209, चंद्रपूर 3 लाख 72 हजार 455, बल्लारपूर 3 लाख 11 हजार 094, ब्रह्मपुरी 2 लाख 75 हजार 221, चिमूर 2 लाख 79 हजार 581 तर वरोरा मतदार संघात 2 लाख 80 हजार 980 मतदारांचा समावेश आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!