Electric bus charging station : चंद्रपूर शहरात ई-बस चार्जिंग स्टेशन

Electric bus charging station केंद्र सरकार पुरस्कृत पी -एम बस सेवा योजनेअंतर्गत चंद्रपूर शहराला ५० इलेक्ट्रिक बसेस मिळणार असुन या बसेससाठी चार्जिंग स्टेशन व वाहनतळ कृषी भवनच्या जवळील जागेत उभे राहणार आहे. या वाहनतळाचा भूमिपूजन सोहळा गुरुवार ११ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता माननीय नामदार व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे.

राजकिय : आमदार किशोर जोरगेवार यांचा भाजपवर निशाणा, इतकी घाई होती तर….


 Electric bus charging station  शहरातील वीज केंद्र, कोळसा खाणी व पोलाद उद्योगांमुळे चंद्रपूरकरांना वायू व हवा प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. त्यातच वाहन प्रदूषणाची भर पडली.  या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, चंद्रपूर महापालिकेनेही ई-बसेस चालविण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. राज्य सरकारने ऑगस्ट २०२३ मध्ये ‘पीएम ई- बस सेवा’ या नावाने केंद्र- प्रायोजित योजनेला मंजुरी दिली होती. chandrapur city


   या उपक्रमाचा उद्देश केवळ शहरातील लोकांना सोयीस्कर वाहतूक उपलब्ध करून देणे नाही तर पर्यावरण प्रदूषण कमी करणे देखील आहे. -बस‘साठी शहरातील कृषी भवन परिसरातील मोकळ्या भूखंडावर बसस्थानक निर्माण केले जाणार आहे. तीन लाख लोकसंख्येवरील शहरांना ५० ई-बसेस उपलब्ध करून देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्यानुसार महापालिकेने पहिल्या टप्प्यात ३० व दुसऱ्या टप्प्यात २० ई-बसेस सुरू करण्याचा प्रस्ताव पाठविला होता. (Electric bus charging station)

भाजपवर निशाणा


   या भूमिपूजन सोहळ्यास मा.ना.श्री.विजय वडेट्टीवार, मा.खासदार श्रीमती प्रतिभा धानोरकर, मा.आमदार श्री.सुधाकर अडबाले, मा.आमदार किशोर जोरगेवार तसेच इतर मान्यवर उपस्थीत राहणार आहेत.  

ई-बस म्हणजे काय ?

ई-बस ही एक शून्य उत्सर्जन बस आहे. ती साधारणतः कोणताही आवाज करत नाही. ते इंधनाऐवजी विजेवर चालते. अशा बसेस ऑनबोर्ड बॅटरी पॅक किंवा बाह्य स्रोताकडून ऊर्जा प्राप्त करतात. जलद चार्जरवर ई-बस एक ते दीड तासात चार्ज करता येते. ते एका चार्जमध्ये किमान १२० किमी धावू शकते. डीटीसी फ्लीटमधील ई-बस शून्य टेलपाइप उत्सर्जनासह ते इंधनावर आधारित वाहनांवरून इलेक्ट्रिक वाहनांवर स्विच करते, अशा ई-बसेस प्रदूषणावर मात करण्यास प्रभावी ठरतात.

ई-बसमध्ये काय विशेष आहे?

ई-बसेसच्या किमतीनुसार त्यात विविध सुविधा असतात. यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, प्रत्येक बसमध्ये १० पॅनिक बटणे आणि एक टूटर असतो. शिवाय, दिव्यांग प्रवाशांसाठी गुडघे टेकण्याचा स्म्प व महिला प्रवाशांसाठी खास आसनांची व्यवस्था असते.

ई-बस’ कुठून कुठपर्यंत ?

चंद्रपूर शहर व लगतच्या २५ किलोमीटर परिसरातील गावांपर्यंत बससेवा सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. या बसेस चंद्रपुरातून बामणी, बल्लारपूर, भदावती, घुग्गुस. आरवट-चारवट तसेच मूल मार्गावरील चिचपल्लीपर्यंत धावतील. 

          

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!