Elgar morcha : दिक्षाभूमीच्या या मागणीसाठी चंद्रपुरात एल्गार मोर्चा

Elgar morcha 11 ऑक्टो. ला समस्त आंबेडकरी समाजाचा महामोर्चा काढण्यात आला, ह्या मोर्चात हजारो आंबेडकर अनुयायी सहभागी झाले होते, चंद्रपुरातील दिक्षाभूमीची जागा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाला अपुरी पडत असून प्रशासनाने चांदा क्लब मैदान व शासकीय विश्रामगृह हे त्यादिवशी खुले करीत विश्रामगृह येथे बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक निर्माण करावे अशी मागणी घेऊन आंबेडकर अनुयायांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

अवश्य वाचा : 15 व 16 ऑक्टोबर रोजी चंद्रपुरात वाहतूक व्यवस्थेत बदल

Elgar morcha 14 ऑक्टो. 1956 ला नागपूर येथे तर 16 ऑक्टो. 1956 ला चंद्रपूर येथे लाखों लोकांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म दिक्षा दिली. सध्या स्थितीत दिक्षाभूमीची जागा 15 व 16 ऑक्टो. च्या धम्मचक्र अनुवर्तन कार्यक्रमासाठी जागा अपुरी पडत असल्याने जागेची कमतरता दूर करण्यासाठी चांदा क्लब ची जागा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी शासकीय विश्राम गृहाची जागा देण्याची मागणी आंबेडकरी समाजाने महामोर्चा द्वारे केली आहे.


चांदा क्लब येथील मद्य परवाना व जुगार परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी आजच्या महामोर्चा मध्ये करण्यात आली.


गांधी चौकातून सुरू झालेला हा मोर्चा शहराचे भ्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला, आयोजित मोर्च्यात सहभागी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रवीण खोब्रागडे म्हणाले की दिक्षाभूमीजवळ बनविलेला पूल तोडण्यात यावा, बाबासाहेब आंबेडकर याचं भव्य स्मारकाची निर्मिती करण्यात यावी अन्यथा याहून मोठे आंदोलन आम्ही उभारू असा इशारा दिला.


यावेळी भूमिपुत्र ब्रिगेडच्या अभिलाषा गावतुरे, बसपा जिल्हाध्यक्ष शिरीजकुमार गोगुलवार, प्रवीण खोब्रागडे, बंडू नगराळे, डॉ राकेश गावतुरे यांची उपस्थिती होती.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!