Agricultural Assistant Bribe Chandrapur | महाडीबीटी योजनेत भ्रष्टाचार! कृषी सहाय्यकाला 1 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक

Agricultural Assistant Bribe Chandrapur

Agricultural Assistant Bribe Chandrapur चंद्रपूर – महाडीबीटी योजनेतून मंजूर झालेला फवारणी बॅटरी स्प्रे पंप अर्जदाराला देण्यासाठी कृषी सहायकाने 1 हजार रुपयांची लाच मागितली, 4 फेब्रुवारीला कृषी सहायकाला हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. 36 वर्षीय सरजीव अजाबराव बोरकर असे कृषी सहायक वर्ग 3 चे नाव आहे.

तक्रारदार हे शेतकरी असून त्यांनी ते मौजा नंदोरी तालुका भद्रावती येथे राहतात, त्यांनी महाडीबीटी योजनेअंतर्गत सप्टेंबर 2024 मध्ये शेतमाल फवारणी करीता बॅटरी स्प्रे पंप मिळावा यासाठी तालुका कृषी अधिकारी भद्रावती येथे अर्ज केला होता. MahaDBT Scheme Corruption

चंद्रपूर जिल्ह्यात बर्ड फ्लू चे आगमन, जिल्ह्यातील या भागात अलर्ट


तक्रारदाराचा अर्ज सप्टेंबर महिन्यातच मंजूर झाला होता, त्यानुसार ऑक्टोबर महिन्यात 7 तारखेला मौजा चंदनखेडा भद्रावती येथे कृषी विभागामार्फत स्प्रे पंप वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, मात्र त्यादिवशी तक्रारदार बाहेर गावी गेले असल्याने ते कार्यक्रमाला येऊ शकले नाही. (Chandrapur Anti-Corruption Bureau Action)


बाहेरगावुन परत आल्यावर तक्रारदार यांनी स्प्रे पंप मिळावा यासाठी कृषी अधिकारी कार्यालय भद्रावती येथे कृषी सहायक बोरकर यांची भेट घेतली, मात्र त्यांनी स्प्रे पंप देण्यास टाळाटाळ केली.

चंद्रपूर जिल्ह्यात शिकाऱ्याची कॉलिंग


3 फेब्रुवारीला कृषी सहायक बोरकर यांनी तक्रारदार सोबत दूरध्वनी वर संपर्क साधला व स्प्रे पपं हवा असेल तर 1 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले.
मात्र तक्रारदाराला पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधत तक्रार दाखल केली. (Battery Spray Pump Bribery Case)


तक्रारीची पडताळणी व योग्य शहानिशा केल्यावर पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले यांनी सापळा रचला व आज 4 फेब्रुवारीला नंदनवन प्रवेशद्वार विनायक ले आऊट वरोरा येथे पंचासमक्ष कृषी सहायक सरजीव बोरकर याला 1 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली.


सदरची कारवाई पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे, पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, पोलीस कर्मचारी वैभव गाडगे, अमोल सिडाम, प्रदीप ताडाम, राकेश जांभुळकर, पुष्पा काचोळे, सतीश सिडाम यांनी केली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!