Chandrapur truck accident | चंद्रपुरात मोठी दुर्घटना, ट्रक चालक जिवंत जळाला

Chandrapur truck accident

Chandrapur truck accident : चंद्रपूर: भाजीपाला घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाला झोपेची डूलकी आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून ट्रकची झाडाला टक्कर बसली. अपघातात ट्रकच्या केबिनला आग लागली. यात ट्रक चालक जळून मृत्यू झाला.

चमन ठाकूर असे मृत ट्रकचालकाचे नाव आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री चंद्रपूर गडचिरोली मार्गावरील वलनी गावाजवळ घडली.

महापुरुषांच्या पुतळा विटंबना प्रकरणी कठोर कायदे करा

घटनेची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच रामनगर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक खरकाडे व त्यांची चमू घटनास्थळावर दाखल झाली फायर ब्रिगेड बोलून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र यावेळी ट्रक चालकाचा जळुन मृत्यू झाला होता.

कोबी वर्षांपूर्वी अशीच घटना चीचपल्ली जवळ घडली होती या घटनेत तब्बल 12 ते 16 नागरिकांचा जळुन मृत्यू झाला होता.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!