Attack on police officer in Chandrapur । चंद्रपूर पोलिसांवर पुन्हा हल्ला, शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

Attack on police officer in Chandrapur

पोलिसांना शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी

Attack on police officer in Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारी ने राक्षसी रूप धारण केले असून या राक्षसी रूपाच्या विळख्यात पोलीस कर्मचारी सुद्धा पिसल्या गेले आहेत. चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत महिना भरापूर्वी पोलीस शिपायाची हत्या झाली होती. आता पुन्हा कर्तव्यावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षाला मारहाण केल्याची धक्कादायक १० एप्रिल रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. Chandrapur police attack

चैत्र नवरात्री निमित्त भाविकांच्या सुरक्षेसाठी महाकाली मंदिर परिसरात जिल्हाभरातून पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी बोलाविण्यात आले आहे, भाविकांची सुरक्षा करतेवेळी पोलीस सुद्धा असुरक्षित झालेले आहे असे चित्र या घटनेतून पुढे आले आहे.

चंद्रपुरातील इरई नदी होणार स्वच्छ

१० एप्रिल रोजी अंचलेश्वर गेट जवळ पोलीस आपलं कर्तव्य बजावीत होते, यावेळी त्याठिकाणी पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे, पोलीस उपनिरीक्षक दत्ता जाधव, वाहतूक पोलीस नितीन दुभे व सुधीर रणदिवे उपस्थित होते. रात्री ९.३० वाजता मालवाहू चारचाकी वाहन त्याठिकाणी आले. पोलिसांनी नियमांप्रमाणे वाहन चालकाला कुठे जायचं आहे, पास आहे का असे विचारले मात्र वाहनातील दोघांनी पोलिसांना अश्लील शब्दात शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. Chandrapur law and order

कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी त्यांचा विरोध करीत समजविण्याचा प्रयत्न केला, मात्र ते दोन्ही इसम पोलिसांवर धावून गेले त्यातील एकाने पोलीस उपनिरीक्षक दराडे यांची गच्ची पकडत मारहाण करीत शिवीगाळी केली. त्या पोलिसाला मारलं ती घटना तुम्ही विसरले काय? तुमची अवस्था तशीच करणार अशी जीवे मारण्याची धमकी त्या दोघांनी पोलीस कर्मचारी व पोउपनि यांना दिली.

पोलिसांनी तात्काळ शहर पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांना संपर्क करीत घडलेला प्रकार सांगितला, पोलीस कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले व त्या दोघांना आपल्या ताब्यात घेतले. २८ वर्षीय आदिल अल्ताफ आरा, २२ वर्षीय अयान अल्ताफ आरा दोघे राहणार भावसार चौक घुटकाला यांच्यावर कलम १३२ , २२३, २९६, ३५१ (३), ११५ (२) शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

या घटनेवरून चंद्रपूर पोलिसही आता असुरक्षित आहे असे चित्र निर्माण झाले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!