false extortion case | “तक्रार केली म्हणून खोटा गुन्हा?” – विक्रांत सहारे यांचा पलटवार

false extortion case

false extortion case : चंद्रपूर – युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्याविरोधात माती उत्खनन करणाऱ्या कावेरी कंपनीने 5 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याच्या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. उबाठा शिवसेना प्रणित युवासेना जिल्हाप्रमुख सहारे यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत माझ्यावर कावेरी कंपनीने खोटे गुन्हे दाखल केले आहे असा आरोप लावला. child labor in mining

भंगार दुकानाची आग शासकीय वसाहतीच्या दारात


चंद्रपुर जिल्हा कोळसा खाणीने वेढला असून यामुळे इतर कंपन्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत आहे, भटाळी कोल माईन्स मधून माती चे उत्खनन करण्याचे काम आंध्रप्रदेश मधील कावेरी सी 5 जेवी या कंपनीला मिळाले आहे. त्यामुळे स्थानिकांना कंपनीत रोजगार मिळेल अशी आशा अनेकांना लागली मात्र त्या कंपनीमध्ये अल्पवयीन मुलांकडून पैसे घेत कामावर घेण्यात आले, डिसेंम्बर महिन्यात अल्पवयीन मुलगा कामावर लागला मात्र कावेरी कंपनीतील प्रोजेक्ट मॅनेजर वेंकटेश्वर रेड्डी यांनी अल्पवयीन मुलाला बोलावीत तू कामाला लागण्यासाठी पैसे का दिले म्हणून त्याला मारहाण करीत कामावरून काढले व ही बाब कुणाला सांगू नको असे खडसावले, सदर घटना जानेवारी 2025 मधली आहे. youth leader news

सदर अल्पवयीन मुलाला कामाचा मोबदला मिळाला नाही उलट त्याला मारहाण करण्यात आली. अल्पवयीन मुलाच्या आईने न्यायासाठी युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्याकडे मदत मागितली. false extortion case


20 मार्च रोजी विक्रांत सहारे यांनी अल्पवयीन मुलगा व त्याची आई यांना सोबत घेत कावेरी कंपनीत कामाचा मोबदला व मारहाण का केली याबाबत जाब विचारला मात्र मॅनेजर रेड्डी यांनी अरेरावी ची भाषा करीत तुम्हाला जे करायचं ते करा असे उत्तर दिले. 22 मार्चला सहारे यांनी कावेरी कंपणीविरुद्ध कामगार आयुक्त यांच्याकडे दाद मागितली, सदर कंपनीमध्ये अल्पवयीन मुलांकडून अवजड कामे करून त्यांना मोबदला न देता मारहाण करण्यात येते अशी तक्रार केली. याबाबत कारवाई संदर्भात कामगार आयुक्ताने संबंधित विभागाकडे पत्र व्यवहार सुरू केला.

विक्रांत सहारे यांनी कंपनी बाबत तक्रार का केली म्हणून 31 मार्च रोजी विक्रांत सहारे यांनी 5 लाखांची खंडणी मागितली असा गुन्हा रेड्डी यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला. mining company controversy

यावर 19 एप्रिलला विक्रांत सहारे यांनी पत्रकार परिषद घेत कावेरी कंपनी व पोलीस प्रशासनाने खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला, ते म्हणाले रेड्डी यांनी दिलेल्या तक्रारीत त्यांच्या कार्यालयातील 2 कर्मचारी माझ्या जनसंपर्क कार्यालयात आले आणि मला कामगार आयुक्तांना तक्रार का केली असे विचारले, त्यावर माझा इगो हर्ट झाला, आता मला 5 लाख रुपये व माझे काही लोक कामावर घ्या असा उल्लेख आहे.


मात्र या प्रकरणात ते दोन कर्मचारी फिर्यादी व्हायला हवे होते तसे झाले नाही, जे माझ्या कार्यालयात कधी आले नाही ते या प्रकरणात फिर्यादी बनले, विशेष बाब म्हणजे त्यांच्या तक्रारीत उल्लेख असलेले दोन्ही कर्मचारी माझ्या कार्यालयात आलेच नाही, 2 एप्रिलला त्यामधील एका कर्मचाऱ्याने पोलीस स्टेशनमध्ये हमीपत्र दाखल केले की आम्ही विक्रांत सहारे यांच्या कार्यालयात कधी गेलेलो नाही, आमचं नाव त्या पोलीस तक्रारीत टाकण्यात का आले हे सुद्धा आम्हाला समजले नाही.

youth leader news

यावर रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख म्हणाले की आमच्याकडे कावेरी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर रेड्डी यांनी खंडणी मागितली याबाबत फिर्याद दिली, नियमाप्रमाणे आम्ही त्यांची तक्रार दाखल केली, फिर्याद दाखल झाल्यावर ती तक्रार खरी की खोटी हे तपासात निष्पन्न होणार, त्यांनतर यावर न्यायालय निर्णय देईल, या प्रकरणी पोलिसांनी आपलं कर्तव्य बजावलं आहे.

सदर अल्पवयीन कामगार मारहाण प्रकरण आता दिल्ली राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडे वर्ग करण्यात आले आहे. लवकरच पुढील कारवाई होणार अशी माहिती आहे.
आयोजित पत्रकार परिषदेत युवासेना विस्तारक संदीप रियाल पटेल, कांग्रेसचे प्रशांत भारती, आपचे राजू कुडे, राष्ट्रवादी कांग्रेसचे संजय ठाकूर उपस्थित होते.

vikrant sahare

विक्रांत सहारे यांनी याबाबत धक्कादायक खुलासा केला की या गुन्ह्यामागे राजकीय षडयंत्र असून शहरातील एका युवा उद्योजकांच्या सांगण्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, वास्तविक बघता माझं राजकीय करिअर उध्वस्त करण्याचा हा प्रकार आहे, पुढील काही दिवसात त्या उद्योजकांचे नाव आपल्यासमोर आणणार. या प्रकरणी आम्ही मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार आहोत.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!