homemade liquor bust । दुर्गापूर पोलिसांची धाडसी कारवाई; गावठी दारू निर्मितीला आळा

homemade liquor bust

homemade liquor bust : दुर्गापूर, दि. 21 एप्रिल 2025 : पोलीस स्टेशन दुर्गापूर हद्दीतील मौजा वरवट शेतशिवारात ढोडा नाल्याजवळ सुरु असलेल्या अवैध मोहदारूच्या अड्ड्यावर आज दि. 21 एप्रिल रोजी सकाळी पोलिसांनी छापा टाकत ७२,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत तिघांविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. country liquor raid news

पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, सदर ठिकाणी आरोपी मोहदारूची हातभट्टी लावून मोहफुलाच्या सडव्यातून गावठी दारूची निर्मिती करीत होते. यावरून पोलीस निरीक्षक श्री. संदीप इकडे पाटील यांच्या नेतृत्वात आणि पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने छापा टाकला. moha daru case India

country liquor raid news

बल्लारपुरातील रस्त्यावरून धावणार विकास

जप्त मुद्देमालाचा तपशील खालीलप्रमाणे:

  • 02 लोखंडी ड्रममध्ये 300 लिटर गरम मोहा सडवा ड्रमसह – ₹32,000/-
  • 02 प्लास्टिक ड्रममध्ये मोहा सडवा ड्रमसह – ₹30,800/-
  • 02 प्लास्टिक डबक्यांमध्ये गावठी मोहदारू (40 लिटर) डबकीसह – ₹6,200/-
  • 02 प्लास्टिक ड्रम – ₹800/-
  • 02 जर्मन घमेले – ₹2,000/-
  • 02 पीपे, 01 स्टील बकेट, 01 प्लास्टिक गाळणी, 02 प्लास्टिक पाईप तुकडे – ₹300/-

एकूण मुद्देमालाची किंमत – ₹72,100/-

या प्रकरणात 1) धनराज खोब्रागडे, 2) दिनेश रायपुरे, 3) प्रतिमा रायपुरे (सर्व रा. वरवट) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही धाडसी कारवाई पो.ह. स्वप्निल बुरीले, गुरुदेव मजोके आणि वरवट गावच्या पोलीस पाटील श्रीमती ललिता रायपुरे यांच्या मदतीने करण्यात आली.

पोलीस विभागाने अशा अवैध मोहदारू तयार करणाऱ्या अड्ड्यांवर कारवाई करत अवैध दारू व्यवसायाला चाप लावण्याचा इशारा दिला आहे. पुढील तपास दुर्गापूर पोलीस करत आहेत.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!