Balubhau Dhanorkar tribute event
Balubhau Dhanorkar tribute event : चंद्रपूर : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय दिवंगत खासदार बाळुभाऊ धानोरकर यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त आयोजित ‘आठवणीतले बाळूभाऊ’ हा पुण्यस्मरण कार्यक्रम काल, शुक्रवार, दिनांक ३० मे २०२५ रोजी सायंकाळी वरोरा येथील शगुन हॉलमध्ये भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. बाळुभाऊंच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक, कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चंद्रपूर भाजपमध्ये फेरबदल, महानगर अध्यक्ष बदलला
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नानाभाऊ पटोले होते. त्यांनी बाळुभाऊंच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या लोककल्याणकारी दृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित केले.
याप्रसंगी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले, खासदार प्रतिभाताई धानोरकर, खासदार नामदेवराव किरसान, माजी मंत्री तथा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, आमदार सुधाकरजी अडबाले, आमदार अभिजीतजी वंजारी,आमदार किशोर जोरगेवार, आमदार संजयजी दरेकर, आमदार कीर्तीकुमार भांगडीया, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, माजी आमदार वामनराव कासावार, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुलवार, माजी आमदार विश्वासजी नांदेकर,
माजी आमदार अविनाश वारजुरकर, माजी आमदार ख्वाजा बेग, रघुवीर अहिर, काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हा प्रभारी मुजीब पठाण, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, जिल्हाध्यक्ष रविंद्रजी शिंदे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उबाठा) जिल्हाध्यक्ष संदिप गिहे, मनसे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रपूर जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, शिवसेना (उबाठा) जिल्हाध्यक्ष नितीनजी मत्ते आणि मनसे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे, सुरजकुमार बोबडे यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. Balubhau Dhanorkar tribute event

कार्यक्रमादरम्यान, बाळुभाऊ धानोरकर यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी केलेल्या योगदानाला सलाम करण्यात आला. अनेक वक्त्यांनी बाळुभाऊंच्या साधेपणाची, व्यापक जनसंपर्काची आणि लोकसेवेच्या त्यांच्या तळमळीची आठवण करून दिली. त्यांच्या आदर्श कार्याची प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा संकल्प यावेळी अनेकांनी केला. MP Balubhau Dhanorkar legacy
शेकडो ऑटोचालकांना विमा संरक्षण कवच आणि सामाजिक उपक्रम
या कार्यक्रमाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी शेकडो ऑटो चालकांना प्रत्येकी दहा लक्ष रुपयांचे विमा संरक्षण कवच प्रदान करण्यात आले. या विमा कवचाची एकूण रक्कम पाच कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार आहे. तसेच, सामाजिक उपक्रमांतर्गत कल्पतरू गणेश मंडळास वातानुकूलित शव पेटी भेट देण्यात आली. बाळूभाऊंच्या समाजसेवेच्या वृत्तीचे स्मरण करून देणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला. Insurance for Indian auto drivers 2025
बाळुभाऊ धानोरकर मित्र परिवाराने चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातील सर्व नागरिक, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांना आदरांजली वाहिली आणि त्यांच्या स्मृतींना वंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ प्रशांत खुळे यांनी तर प्रास्ताविक पंडित लोंढे केले. प्रवीण काकडे यांनी आभार मानले.
हा कार्यक्रम बाळुभाऊंच्या कार्याचे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे स्मरण करणारा एक यशस्वी कार्यक्रम ठरला.
