bike theft caught in Chandrapur
bike theft caught in Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात दुचाकी चोरी करणारा चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती लागला असून आरोपीकडून एकूण ४ दुचाकीसहित १ लक्ष ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२६ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील बाबुपेठ वॉर्ड निवासी २६ वर्षीय राकेश अमर वाडके याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याच्याजवळून पोलीस स्टेशन बल्लारपूर, भद्रावती, रामनगर व एक बेवारस दुचाकी अश्या एकूण ४ दुचाकी वाहने चोरी केल्याचे कबूल केले. stolen bikes recovered by police
गुन्ह्यात जप्त वाहन
- पोलीस स्टेशन बल्लारपूर हद्दीतील – हिरो पॅशन प्रो मोटार सायकल क्रमांक MH ३४ AR ०४५२
- भद्रावती येथील हिरो स्प्लेंडर मोटर सायकल क्रमांक MH ३६ R ४०६८
- पोलीस स्टेशन रामनगर – हिरो स्प्लेंडर वाहन क्रमांक MH ३४ X ३७५२
- बेवारस होंडा ऍक्टिव्हा वाहन क्रमांक MH ३४ CB ४९८४ जप्त करण्यात आले.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकर, पोउपनि संतोष निंभोरकर, पोलीस कर्मचारी जयसिंग, गणेश मोहुर्ले, दिनेश अराडे, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे व मिलिंद जांभुळे यांनी केली.
गुन्ह्याचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.
