card gambling in jungle । वाघाच्या दहशतीतही जंगलात ५२ पत्त्यांचा जुगार! पोलिसांनी ११ जणांना पकडलं

card gambling in jungle

card gambling in jungle : भिसी – भिसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत बाघाई जंगलात ५२ पत्त्यांचा जुगार खेळत असताना एकूण ११ जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली, यावेळी मोबाईल, तीन दुचाकी असा एकूण ३ लक्ष १९ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

खासदार धानोरकर यांच्या पाठपुराव्याला यश, हाताला पुन्हा काम भेटणार

सध्या जिल्ह्यात वाघाची दहशत सुरु आहे, ८ दिवसात ८ नागरिकांची वाघाने शिकार केल्याची घटना घडली, मात्र वाघाच्या दहशतीला न घाबरता ११ जुगार बहाद्दरांनी थेट जंगलात जाऊन ५२ पत्त्यांचा जुगार सुरु केला. local crime branch gambling raid forest

Powered by myUpchar

जंगलात रंगला जुगार

मात्र हि माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली असता १८ मे रोजी जुगार अड्ड्यावर धाड मारीत तब्बल ११ जुगार बहाद्दरांना जुगार खेळताना अटक करण्यात आली. ११ जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनिय अन्व्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संतोष निभोरकर, पोलीस उपनिरीक्षक सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी नितीन कुरेवार, नितीन साळवे, जय सिंह, गणेश मोहुर्ले, संतोष येलपुलवार, गणेश भोयर, गोपाळ आतकुलवार व नितीन रायपुरे यांनी केली. जुगार प्रकरणाचा पुढील तपास भिसी पोलीस करीत आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!