Cyber Scam CDCC Bank
Cyber Scam CDCC Bank : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तब्बल २.९३ कोटींचा सायबर घोटाळा झाल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंतर, या प्रकरणाची तातडीने फॉरेन्सिक चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. याबबत त्यांनी पोलिस महासंचालकांना निवेदन सादर केले होते. या मागणीची दखल घेत पोलीस महासंचालकांनी तातडीने जिल्हा पोलिस अधीक्षकांना या प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. Cyber Fraud in Chandrapur
आमदार खासदार भिडले श्रेयवादाच्या लढाईत
दिनांक ७ ते १० फेब्रुवारी २०२५ दरम्यान चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सायबर हल्ल्यातील गैरव्यवहारामुळे एकूण ₹३.६० कोटींच्या व्यवहारात आर्थिक घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात केवळ ₹९० लाखांची रक्कम परत मिळवण्यात पोलिसांना यश आले असून, उर्वरित २.९३ कोटींची रक्कम अद्यापही गहाळ आहे. यामध्ये बँकेचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयटी विभागप्रमुख, संगणक सहाय्यक तसेच सायबर सिक्युरिटी पुरवठादार यांच्या संगनमताचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
न्याय प्रक्रियेचा अवमान । Cyber Scam CDCC Bank
विशेष म्हणजे, बँकेने सायबर सुरक्षिततेसाठी तब्बल १०० कोटींचा खर्च दाखवूनही कोणतीही ठोस सुरक्षित व्यवस्था न ठेवता, विमा संरक्षणही घेतलेले नव्हते. इतकेच नव्हे, तर न्यायालयीन परवानगी न घेता ग्राहकांची रक्कम नफ्यातून परत करून बँकेने न्यायप्रक्रिया चाही अवमान केला आहे.

फॉरेन्सिक अहवाल दिशाभूल करणारा
बँकेच्या आंतरर्गत समितीने तयार केलेला फॉरेन्सिक अहवाल अपुरा व दिशाभूल करणारा असल्याने, त्याची पुनर्तपासणी स्वतंत्र तज्ज्ञांमार्फत करण्यात यावी, अशीही मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. या प्रकरणातील सर्वांगीण चौकशीसाठी विशेष तपास पथक नेमण्यात यावे, दोषींवर तातडीने कारवाई व्हावी, अशीही त्यांनी मागणी केली आहे. या सर्व मागण्यांची गांभीर्याने दखल घेत पोलिस महासंचालकांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना त्वरित चौकशी करून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाची लवकरच सखोल चौकशी होणार असून, दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
