international standard museum proposal
international standard museum proposal : चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी एका भव्य आंतरराष्ट्रीय दर्जाचे संग्रहालयाची उभारणी करावी, अशी मागणी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. आज जिल्हाधिकारी विनय गौंडा यांची भेट घेऊन या संग्रहालयचा प्रस्ताव तयार करण्याची विनंती केली आहे.
चंद्रपूर हा ऐतिहासिक जिल्हा
खासदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या, “चंद्रपूर जिल्हा हा ऐतिहासिक, पुरातत्त्वीय आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून एक समृद्ध व गौरवशाली परिसर आहे. येथे प्राचीन मंदिरांचे अवशेष, शिलालेख, धातू व दगडी मूर्ती, प्राचीन वास्तू आणि स्थापत्यशैलीचा अनमोल ठेवा आजही अस्तित्वात आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक मूर्ती व पुरावस्तू सापडल्या आहेत.” tourism potential of Chandrapur
Powered by myUpchar
त्या पुढे म्हणाल्या, “जिल्ह्यात एक सुसज्ज संग्रहालय नसल्यामुळे अनेक ऐतिहासिक वस्तू आणि कलाकृती योग्य देखभालीअभावी दुर्लक्षित आहेत. त्यामुळे या सर्वांना एकाच ठिकाणी आणून त्यांचे योग्य प्रदर्शन करणे गरजेचे आहे. या संग्रहालयातून केवळ जिल्ह्याच्या इतिहासाची माहिती मिळेल असे नाही, तर ते शिक्षण आणि संशोधनाचे केंद्र म्हणूनही विकसित होऊ शकेल.”
केंद्र व राज्य सरकार सोबत पाठपुरावा
खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकार आणि संबंधित विभागांना तातडीने या मागणीची दखल घेऊन चंद्रपूर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे संग्रहालय उभारण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. त्यांनी यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देण्याची आणि जागेची निवड प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याची गरज व्यक्त केली आहे.
या संग्रहालयाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्याची पर्यटन क्षमता वाढण्यास मदत होईल, तसेच स्थानिक कलाकारांना आणि कारागिरांना प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आणि सामाजिक संस्थांना या महत्त्वपूर्ण मागणीत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.