juvenile motorcycle theft case
juvenile motorcycle theft case : जिल्ह्यात सुरु असलेल्या गुन्हेगारी जगतामध्ये महिला, पुरुष व आता विधी संघर्ष बाल्कनी एंट्री मारली आहे, घरफोडी असो कि मारहाण या गुन्हेगारीत अल्पवयीन बालके सहभाग घेत असताना निदर्शनास येत आहे. अश्याच दुचाकी चोरी प्रकरणी स्थनिक गुन्हे शाखेच्या पथकाने विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेतले आहे.
वाघाची दहशत झुगारून जंगलात रंगला जुगार
१८ मे रोजी चंद्रपूर रेल्वे स्टेशन चौकात एक विधी संघर्ष बालक विना नम्बरची दुचाकी वाहन विक्री करीता आणली, त्या दुचाकीसाठी तो ग्राहक शोधत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.
Powered by myUpchar
नागपुरात अनेक गुन्हे दाखल
पोलिसांनी सापळा रचत त्या बालकाला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने वेगवेगळ्या ठिकाणाहून २ मोपेड वाहन क्रमांक mh34 cp 1191, mh49 au 8109 जप्त केली. सादर बालकाविरुद्ध नागपूर शहरात अनेक चोरीचे गुन्हे दाखल आहे. underage motorbike theft arrest
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोउपनि सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, प्रशांत नागोसे, किशोर वाकाटे व शशांक बदामवार यांनी केली.