local crime news from Maharashtra । ‘घरी सोडतो’ म्हणत शेतात नेलं आणि… चिमुरमध्ये तरुणीवर तिघांकडून अत्याचार

local crime news from Maharashtra

local crime news from Maharashtra : चिमूर – चिमुर शहरातून पायी जाणाऱ्या एका तरूणीला मोटारसाकलने आजीच्या घरी पोहचवून देत असल्याचे सांगून पाच किमी अंतरावरील दूर शेतशिवारात नेऊन सामुहिक अत्याचार केल्याची घटना चिमुर शहारात उघडकीस आली आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. एक जण फरार झाला असून पोलिस मागावर आहेत. प्रतीक सुनील साठोणे (वय २६), विक्की उर्फ विक्रांत खुशाल साठोणे (वय २९), रा. वर्ष नेताजी वार्ड, अंकित संजय काकडे (वय ३१) असे आरोपींचे नाव आहे.

Powered by myUpchar

वाघाच्या दहशतीला झुगारून जंगलात रंगला जुगार

चल आजीच्या घरी सोडतो आणि….


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमूर शहरातीलच एक तरूणी आपल्या आजीचे घरी दुसऱ्या वार्डात पायी चालली असताना आरोपी युवक प्रतीक सुनील साठोणे यांने त्या तरूणी जवळ जावून आजीच्या घरी सोडून देण्याचा विश्वास दाखविला. त्यामुळे तरूणी मोटारसाकलवर बसली, परंतु आरोपीने तिला आजीच्या घरी न सोडता शहरापासून द5 किमी दूर अंतरावरील तळोधी नाईक गावाच्या शेत शिवारातील झोपडीत नेऊन अत्याचार केला. त्यानंतर अन्य आरोपी विक्की उर्फ विक्रांत खुशाल साठोणे व अंकित संजय काकडे या दोघांनी तेथे जाऊन पीडितेवर अत्याचार केला. या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. girl raped in village news

२ आरोपीना अटक एक पसार


काल सोमवारी (२० मे) पिडीत तरूणीने चिमुर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपी विरोधात कलम 64, 70 (1), 351 (2), 3 (5) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणात प्रतीक सुनील साठोणे (वय २६), विक्की उर्फ विक्रांत खुशाल साठोणे (वय २९), रा. वर्ष नेताजी वार्ड यांना अटक करण्यात आली आहे तर अंकित संजय काकडे (वय ३१) फरार झाला आहे. त्याच्या मागावर चिमूर पोलिस आहेत. या घटेनचा तपास पोलिस निरीक्षक संतोष बाकल यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक दीप्ती मरकाम करीत आहेत.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!