manrega news chandrapur today
manrega news chandrapur today : चंद्रपूर: ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू लोकांसाठी आधार ठरलेल्या मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) कामांवरील स्थगिती उठवण्यात खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना यश आले आहे.
चंद्रपूर मनपाने जप्त केले ३० टिल्लू पंप
आयुक्त व मंत्र्यांकडे पत्राद्वारे पाठपुरावा
गेल्या काही दिवसांपासून मनरेगाची कामे थांबल्याने ग्रामीण भागातील मजुरांवर उपासमारीची वेळ आली होती. या समस्येकडे खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी तातडीने लक्ष वेधून त्यांनी महाराष्ट्र शासनाचे ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे तसेच मनरेगा आयुक्तांना पत्र लिहून तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली. manrega work news today
Powered by myUpchar
आपल्या पत्रात (पत्र क्रमांक १७८७/२०२५, दिनांक ५.५.२०२५) खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी नमूद केले की, मनरेगा ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांसाठी एक महत्त्वाचा आधार आहे आणि कामे थांबल्याने लोकांचे जीवन अडचणीत आले आहे. त्यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालून कामे पूर्ववत सुरू करण्याची विनंती केली होती.
खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या या पाठपुराव्यामुळे शासनाने तातडीने दखल घेतली आणि मनरेगाची कामे पुन्हा सुरू करण्याचे आदेश (दिनांक १३.५.२०२५) जारी केले. यामुळे ग्रामीण भागातील मजुरांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद परतला आहे. या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे सर्व ग्रामस्थांनी आभार मानले आहे.