mla kishor jorgewar development work । शब्द नव्हे, कृती! किशोर जोरगेवारांच्या विकास कामांचं प्रत्यक्ष उदाहरण

mla kishor jorgewar development work

mla kishor jorgewar development work : चंद्रपूर – शिक्षण ही आपल्या समाजाची खरी ताकद आहे. ही ताकद भक्कम करायची असेल, तर त्यासाठी पायाभूत सुविधा पुरवणं ही आमची जबाबदारी आहे. आजचं हे भूमिपूजन म्हणजे केवळ एका इमारतीची सुरुवात नाही, तर ज्ञानदालन उभारण्याची प्रक्रिया आहे. विद्यार्थ्यांना शांत, प्रेरणादायी आणि आधुनिक वातावरणात अभ्यास करण्याची संधी देणारी ही वास्तू असून, पडोली येथे उभारण्यात येणारी ही अभ्यासिका शैक्षणिक प्रगतीसाठी भक्कम पाया ठरेल, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

mla funded development projects

२४ वर्षीय तरुणांकडून चंद्रपुरात एमडी पावडरची विक्री

जिल्हा परिषदेच्या अंतर्गत एक कोटी रुपयांच्या निधीतून पडोली येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक अभ्यासिकेच्या कामाचे भूमिपूजन आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, पडोली ग्रामपंचायतीचे सरपंच विक्की लाडसे, उपसरपंच संगीता नागरकर, नामदेव डाहुळे, प्रकाश देवतळे, बलराम डोडाणी, मनोज पाल, नकुल वासमवार, ग्रामपंचायत सदस्या छाया पायधन, शामलता ईटनकर, सुनीता पिंपळकर, शबाना शेख, राकेश पिंपळकर, संजय बुरघाटे, जय मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते. mla funded development projects

माझ्या विधानसभेतील प्रत्येक विद्यार्थी अधिकारी बनेल

पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले, ही केवळ एका इमारतीची सुरुवात नसून आपल्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी टाकलेले एक विश्वासार्ह आणि महत्त्वाचे पाऊल आहे. माझ्या मतदारसंघातील प्रत्येक विद्यार्थी पुढे जावा, स्पर्धा परीक्षा देऊन यश मिळवावे, अधिकारी बनावा, यासाठी ही अभ्यासिका उपयुक्त ठरेल. अभ्यासिकेमध्ये वाचनालय, बैठकीच्या आधुनिक सुविधा, वीज व पाणी व्यवस्था, मुला-मुलींसाठी स्वतंत्र व्यवस्था अशा सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आपल्या मुला-मुलींनी शिकून मोठं व्हावं, ही फक्त पालकांचीच नाही, तर आमचीही जबाबदारी आहे. त्यामुळे अशा विकासकामांना आम्ही  सर्वोच्च प्राधान्य देत आहोत. government study hall project

Powered by myUpchar

मागील पाच वर्षांत आपण मतदारसंघात ११ अभ्यासिका उभारण्याचा संकल्प केला होता. त्यापेक्षाही अधिक अभ्यासिका आपण उभारू शकलो याचा मला आनंद आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा दिलेल्या दीक्षाभूमी येथे आपण एक कोटी रुपयांतून भव्य अभ्यासिका उभारली आहे, जिथे शेकडो विद्यार्थी अभ्यास करतात. अनेक अभ्यासिकांची कामे प्रगतीपथावर आहेत. आज पडोली येथील अभ्यासिकेचे भूमिपूजन झाले असून, वर्षभरात ही अभ्यासिका पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे, असेही त्यांनी सांगितले.यावेळी बोलताना आमदार जोरगेवार यांनी, अभ्यासिका पूर्ण झाल्यानंतर साहित्य खरेदीसाठी आणखी २५ लाख रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा केली. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Comment