MSEDCL employee awards
MSEDCL employee awards : चंद्रपूर – महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळातील सर्व कार्यालयात १ मे रोजी गुरुवारला महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महावितरणच्या बाबुपेठ येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात मुख्य अभियंता हरिश गजबे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. तर जागतिक कामगार दिनानिमित्त वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी कारणाऱ्या ३६ उत्कृष्ट तांत्रिक कर्मचाऱ्यांना गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. Chandrapur MSEDCL news
जंगल जमीन हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय – शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?
यावेळी चंद्रपुर मंडळाच्या अधिक्षक अभियंता संध्या चिवंडे, अधिक्षक अभियंता (पायाभुत आराखडा) रमेश सानप, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) (प्र.) सुशिल विखार, चंद्रपुर विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर दारव्हेकर, बल्लारशा विभागाचे सत्यदेव पेगल्लापट्टी चाचणी विभाग योगेंद्र निचत वरिष्ठ व्यवस्थापक (विवले) राकेश बोरीवार, यांच्यासह अधिकारी, आभियंते व कर्मचारी उपस्थित होते. Best MSEDCL workers in Chandrapur
सत्कारमूर्ती कर्मचाऱ्यांमध्ये चंद्रपूर मंडळ कार्यालयाचे ३ यंत्रचालक व १५ तांत्रिक कर्मचारी तर गडचिरोली मंडळ कार्यालयातील ३ यंत्रचालक व १५ तांत्रिक कामगारांचा समावेश आहे. यामध्ये कपिल कावळे, संजय तपासे, सुरज पोहिनकर, संदिप नगराळे, विजयकुमार सोंडवले, आकाश देवगडे, मनोज गराडे, महादेव सलाम, रुक्सार अब्दुलरफिक शेख, आशा भगतकर, संजय येरणे, शहिद नौशद मोहम्मद सलिम शेख, निलेश लोदेल्लिवार, गणेश इंदुलवार, जितेंद्र बंसोड, सुधीर चौधरी, दिलीप येरमा, विलास धाकडे, पवन बोरकुटे, आकाश बांबोळे, मोहम्मद निसार शेख, सागर घोरपडे, नितेश श्रीराम, योगेश्वर कोवे, शंकर गेडाम, अमित परचाके, रितेश गाईन, विजय दिवठे, गणेश बुलबुले, विकास घरत, सचिन पेटकर, नितिन कांबळे, नितीन सोनकुसरे, दिनेश मेश्राम, जितेंद्र शहारे यांचा समावेश आहे.