pickpocket caught at bus station । गर्दीत चोरीचा कट फसला! मूल पोलिसांनी पकडले ३ चोरटे

pickpocket caught at bus station

pickpocket caught at bus station : मूल – शहरातील सार्वजनिक ठिकाण बस स्थानक, याठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात प्रवास करण्याकरिता गर्दी जमते मात्र या गर्दीत चोरांचा सुळसुळाट हा वाढलेला असतो. मूल बस स्थानक परिसरात जमलेल्या गर्दीत पाकिटमाराने आपला डाव साधत १८ हजार रुपयांवर डल्ला मारला.

२४ मे रोजी सायंकाळी ४ वाजून ३० मिनिटांनी मूल बस स्थानक येथे बस मध्ये चढत असताना यशवंत भरणे यांच्या पॅन्ट च्या मागील खिशात असलेले १८ हजार रुपये अज्ञाताने चोरले.

स्पर्धा परीक्षांचे मोफत प्रशिक्षण आता चंद्रपुरात

याबाबत भरणे यांनी तात्काळ मूल पोलीस स्टेशन गाठ फिर्याद दिली, पोलिसांनी कलम ३०३ (२) अन्व्ये अज्ञातांवर गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला. तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे मूल बस स्थानक समोर चंद्रपूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची वाट बघणारा ४५ वर्षीय इसम नामे शरद वाघुजी रुयारकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले, त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ १२ हजार ५०० रुपये आढळून आले.

शरद रुयारकर बाबत अधिक माहिती घेतली असता त्याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल आहे अशी माहिती पुढे आली. बस स्थानक परिसरात आरोपी व त्याचे साथीदार टोळकं बनवीत पाकीट मारण्याचे काम करीत होते. pickpocketing gang arrested

पाकिटमारांचे टोळके

पोलिसांनी या प्रकरणी ज्ञानेश्वर उर्फ नाना गुलाब मडावी व विजय उर्फ विजू सुधाकर बेलेकर याना वरोरा मधून अटक करण्यात आली. आरोपीकडून चोरीस गेलेले १८ हजार रुपये नगदी जप्त करण्यात आले. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.

सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी जमीरखां पठाण, भोजराज मुंडरे, चिमाजी देवकते, नरेश कोडापे व संदीप चुधरी यांनी केली. cash stolen from passenger at bus stop

चंद्रपूर पोलिसांनी याबाबत नागरिकांना आव्हान केले कि, बस मध्ये चढत किंवा उतरत असताना आपल्या मौल्यवान वस्तूची काळजी घ्यावी व मागील खिशात पैसे, पाकीट व मोबाईल इत्यादी वस्तू ठेवू नये, जर आपल्याला संशयित इसम आढळले तर तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष चंद्रपूर डायल ११२ वर कॉल करून माहिती द्यावी.

Leave a Comment