Police probe into fake firing incident
Police probe into fake firing incident : चंद्रपूर – ९ मार्च २०२५ रोजी घुग्गुस शहर कांग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी यांच्या घरावर गोळीबार झाला अशी माहिती सर्वत्र पसरली होती, विशेष बाब म्हणजे त्यानंतर विधानसभा अधिवेशनात आमदार जोरगेवार व आमदार वडेट्टीवार यांनी या घटनेबाबत सरकारचे लक्ष वेधले होते.
मात्र २ महिन्यांनंतर तो फुसका बार असल्याचे पोलीस अहवालात निष्पन्न झाल्याने सदर गोळीबाराची माहिती पसरवण्याची कुरघोडी कुणी केली? याबाबत आता पुढील तपास पोलीस करीत आहे.
कांग्रेस घुग्गुस शहर अध्यक्ष राजू रेड्डी यांच्या घरातील पहिल्या मजल्यावरील पोर्च मध्ये काडतुसाच्या समोरील रिकामा केस आढळला होता. पहिल्या मजल्यावर अनुपसिंग चंदेल हे भाड्याने राहतात. Raju Reddy firing case Chandrapur update
घुग्गुस लोहा पुलियाचे काम होणार सुरु, आमदार जोरगेवार यांच्यामुळे काम होणार सुरु
कांग्रेस शहर अध्यक्ष रेड्डी यांच्या घरी गोळीबार झाला असल्याची माहिती ९ मार्चला रात्री वाऱ्यासारखी पसरली होती, पोलिसांनी घटनेची गंभीरता लक्षात घेत तात्काळ रेड्डी यांच्या घरी दाखल झाले. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन हे स्वतः रेड्डी यांच्या घरी पोहचले होते. ९ मार्चला क्रिकेट मॅचचे सर्वत्र प्रसारण सुरु होते.
पोलिसांचा अहवाल आला, गोळीबार नव्हे तो फुसकाबार
फॉरेन्सिक टीम, बीडीएस पथक, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व श्वान आणि आरमोरर पथक यांनी रेड्डी यांच्या घरी भेट देत प्राथमिक चौकशी केली. मात्र गोळीबार झाल्याचे काही चिन्ह आढळून आले नाही. त्यामुळे गुन्ह्याची पुष्टी करताना बॅलेस्टिक तज्ज्ञांना पाचारण केले.
काडतुसाची रिकामी केस कुणाची?
काडतुसाच्या रिकाम्या केसची ई फॉरेस्निक तपासणी करीता सदर काडतुसाची रिकामी केस पाठविण्यात आली, उपसंचालक, प्रादेशिक न्यायवेधक वैज्ञानिक प्रयोगशाळा गृह विभाग नागपूर यांचा अहवाल प्राप्त झाला त्यामध्ये गोळीबार झाला नाही अशी पुष्टी करण्यात आली.
पोलिसांनी सदर प्रकरणाचा सखोल तपासही केला मात्र त्यामध्ये गोळीबार झाला असे निष्पन्न झाले नाही मात्र ती काडतुसाची रिकामी केस आली कुठून हा प्रश्न अजूनही पोलिसांच्या तपासात आहे. याबाबत पुढील तपास सुरु आहे.