Political creditism in Chandrapur
Political creditism in Chandrapur : भद्रावती – लेंडाळा तलाव पुनरुज्जीवन योजनेला नुकतीच अमृत २.० योजनेंतर्गत अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर, या पार्श्वभूमीवर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलेल्या फुकटचे श्रेय घेऊ नये या वक्तव्याला आता नगर परिषदेच्या अधिकृत नोंदीतूनच प्रत्युत्तर मिळाले आहे.
सन 2022 मध्ये अमृत – 2.0 योजने अंतर्गत महाराष्ट्रातील नगरपालिकांना पाणी पुरवठा योजना, सांडपाणी व्यवस्थापन, तलाव खोलीकरण, ग्रीन पार्क या अंतर्गत प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्या अनुषंगाने भद्रावती नगर परिषद कडुन वाढीव पाणी पुरवठा योजना आणि लेंडाळा तलाव सौणदर्यीकरणाचे प्रस्ताव ऑनलाईन दाखल करण्यात आले. ते मंजूर होऊन दोन्ही प्रकल्पा साठी DPR बनवण्या करिता शासनाकडून कळवण्यात आले आणि दोन्ही प्रकल्पाचे DPR बनवून तांत्रिक मान्यता घेऊन सदर प्रकल्प अंतीम मंजुरीकरीता सादर करण्यात आले. lake restoration projects
भद्रावती लेंडाळा तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पावरून आमदार-खासदाराच्या श्रेयवाद रंगला
या दोन्ही प्रकल्पापैकी वाढीव पाणी पुरवठा योजनेला मा प्रधान सचिव यांच्या स्तरावर असलेली SLTC (state Level technical commitee) ची मान्यता भेटून वाढीव पाणी पुरवठा योजना ला तेव्हाच प्रशासकीय मान्यता देखील भेटली. तसेच लेंडाळा तलाव खोलीकरण व सौंदर्यीकरणाच्या प्रस्तावाला देखील SLTC ची मान्यता दि. 4/02/2023 ला भेटली, परंतु प्रशासकीय मान्यता भेटलेली नव्हती.
करण देवतळे वरोरा भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार (mla karan deotale) म्हणून नियुक्त झाल्यावर त्यांनी भद्रावती नगर परिषदेची आढावा बैठक घेतली. या बैठकित जिल्हास्तरावर, मंत्रालयीन स्तरावर कोण कोणते कामे प्रलंबित आहेत याचा रितसर आढावा घेतला. या बैठकीत नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी स्पष्टपणे नमूद केले की, लेंडाळा प्रकल्पास तांत्रिक मान्यता मिळालेली असूनही त्यानंतरही तब्बल 2 वर्षाचा कालावधी होऊनसुध्दा अंतिम मंजुरी म्हणजेच प्रशासकिय मान्यता मिळालेली नाही असे सांगितले. तसेच त्यासोबतच मुख्याधिकारी यांनी जिल्हा स्तरावर पर्यटन निधी अंतर्गत असलेले प्रस्ताव, नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत प्रलंबित E – अभ्यासिकेचा प्रस्ताव तसेच इतरही कामासंबधी आढावा सभेत माहिती दिली. lake restoration projects
पाठपुरावा करीत प्रशासकीय मान्यता आमच्यामुळे
भद्रावती नगर परिषदेच्या समवेत सेलू नगर पंचायत पाणी पुरवठा ,पवनी नगर परिषद अंतर्गत तलाव सौंदरीकरण या नगर पालिका आणि इतरही 5 नगर परिषदा यांचे प्रस्ताव होते त्यांच्या प्रस्तावांना दोन वर्षापुर्वीच प्रशासकीय मान्यता देखील भेटली केवळ भद्रावती नगर परिषदेच्या लेडाळा तलाव खोलीकरण व सौंदर्यीकरणाच्या प्रस्तावाला प्रशासकिय मान्यता भेटलेली नव्हती आणि गेल्या 2 वर्षापासून सदर प्रकरणाची फाईल मुख्यमंत्री कार्यालयाकडे प्रलंबित होती.
प्रकल्प जरी त्यांच्या काळातील असला तरी सतत बैठका घेऊन, मंत्रालयीन संबंधित अधिकारी, नगर विकास मंत्री, मुख्यमंत्री यांचेशी बैठक लावून आमदार करण देवतळे यांनी प्रशासकीय मान्यता प्राप्त केली.
१७ कोटींचा प्रकल्प
भद्रावतीच्या विकासाच्या दृष्टीने तसेच एक नवोपक्रम म्हणुन हि बाब महत्वाची असल्याने आमदार देवतळे यांनी विभागीय आणि मंत्रालयीन पातळीवर सातत्याने पाठपुरावा करून ही प्रक्रिया मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले.
या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अखेर १७ कोटी रुपये खर्चाचा भव्य प्रकल्प मंजूर झाला. केवळ सौंदर्यवृद्धी न करता पर्यावरणीय, सामाजिक आणि नागरिकांच्या दृष्टीने उपयुक्त असा एकात्मिक विकास साधण्याचा हेतू या प्रकल्पामागे आहे. त्यामुळे या प्रकल्पाला मंजुरी मिळवून देणे ही केवळ श्रेय घेण्याची नव्हे, तर भद्रावतीच्या भविष्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची बाब होती. Bhadravati Municipal Council
खासदार म्हणून यापूर्वी काम पाहिलेल्यांचे योगदान अमान्य नाही. मात्र, जेव्हा प्रस्तावास तांत्रिक मान्यता मिळूनही दीर्घकाळ अंतिम मंजुरी प्रलंबित राहते, तेव्हा ती मंजुरी मिळवून देणे ही स्वतंत्र आणि ठोस कृती ठरते. त्यामुळे फुकटचे श्रेय घेण्याचा आरोप निरर्थक असून, भद्रावतीच्या जनतेच्या हितासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी समवेत काम करण्याची गरज असल्याचे आमदार कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले आहे.
