public property theft chandrapur । चंद्रपुरात घनकचरा कंपनीने चोरली पेव्हर्स आणि गिट्टी?, आपची तक्रार

public property theft chandrapur

public property theft chandrapur : चंद्रपूर – शहरातील नागरी सुविधा आणि सौंदर्यीकरणासाठी वापरल्या गेलेल्या शासकीय मालमत्तेची सर्रास चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर शहरात उघडकीस आला आहे. कोहिनूर ग्राउंडवरील वॉकिंग ट्रॅकसाठी वापरलेले पेव्हर्स आणि माता महाकाली महोत्सवाच्या वेळी सार्वजनिक व्यवस्थेसाठी टाकलेली काळी गिट्टी ही दोन्ही शासकीय मालमत्ता अर्बन एनव्हायरो वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड या घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या खासगी कंपनीने चोरून स्वतःच्या खासगी कार्यालयात लावली असल्याचा गंभीर आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. AAP complaint against waste management company

नरभक्षक वाघिणीनंतर बछडा जेरबंद

या प्रकरणी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी चंद्रपूर महानगरपालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार सादर केली असून, यामध्ये त्यांनी संबंधित कंपनीविरुद्ध कारवाई, मालमत्तेची जप्ती, तसेच पोलीस तक्रार व FIR दाखल करण्याची विनंती केली आहे. kohinoor ground pavers stolen case

चोरीचा घटनाक्रम:

  • दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी, कोहिनूर ग्राउंडवरील वॉकिंग ट्रॅकवरील शेकडो पेव्हर्स काढून घेण्यात आले.
  • त्याच दिवशी माता महाकाली मंदिर परिसरात टाकलेली काळी गिट्टी देखील गायब झाली.
  • ही सर्व मालमत्ता शहरातील बायपास रोड, अष्टभूजा जैन पेट्रोल पंप समोर असलेल्या अर्बन एनव्हायरो कंपनीच्या कार्यालयात लावलेली असल्याचे फोटो व साक्षीदारांद्वारे स्पष्ट झाले आहे.

राईकवार यांचा आरोप:

“महानगरपालिकेच्या मालकीची, सार्वजनिक वापरासाठी असलेली शासकीय मालमत्ता खासगी कंपनीने चोरून नेली हे गंभीर गुन्हेगारी कृत्य आहे. ही केवळ चोरी नव्हे, तर नागरी सुविधा नष्ट करण्याचा आणि लोकांच्या पैशांची लूट करण्याचा प्रकार आहे. यामध्ये संबंधित अधिकारी आणि कंपनीतील उच्चपदस्थांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असे राईकवार यांनी सांगितले.

Powered by myUpchar

तक्रारीतील मुख्य मागण्या:

  • अर्बन एनव्हायरो वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करावा.
  • शासकीय मालमत्तेची जप्ती करून मूळ ठिकाणी परत लावण्यात यावी.
  • कंपनीच्या महानगरपालिकेशी असलेल्या कराराची चौकशी करून, करार त्वरित रद्द करण्यात यावा.
  • स्थानिक पोलिस स्टेशनच्या FIR नोंदवून कार्यवाही सुरू करण्यात यावी.
शहरात संतापाची लाट!

या प्रकरणामुळे शहरात संतापाची लाट पसरली असून, नागरिकांकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कोहिनूर ग्राउंडवरील नागरिक आणि महाकाली मंदिर परिसरातील रहिवाशांनी यापूर्वीही मालमत्ता काढली जात असल्याची तक्रार केली होती, मात्र कारवाई करण्यात आलेली नव्हती. kohinoor ground pavers stolen case

महापालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?


सदर कंपनी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचे काम करत असून, त्यांच्या विरुद्ध इतक्या गंभीर स्वरूपाचा आरोप होणे ही महापालिकेच्या देखरेखीतील हलगर्जीपणाचे स्पष्ट लक्षण आहे. यामुळे प्रशासनाची भूमिका आणि पारदर्शकता यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आम आदमी पार्टीचा इशारा:

जर याप्रकरणी तातडीने कारवाई झाली नाही, तर आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल आणि जनतेसोबत एकजूट होऊन जबाबदारांवर कठोर कार्यवाही होईपर्यंत लढा देईल, असा इशारा पक्षाने दिला आहे या वेळी जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार , युवा जिल्हाध्यक्ष राजू कूडे, शहर अध्यक्ष योगेश गोखरे , महानगर संगठन मंत्री सतोष बोपचे ,महिला अध्यक्ष एड तबस्सुम शेख इत्यादि उपस्थित होते .

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!