tiger attack in Chandrapur 2025
tiger attack in Chandrapur 2025 : मूल:- जंगलात बांबूच्या बारीक काडया,सरपण आणि कुडयाची फुले आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केले.ही घटना वनविकास महामंडळाच्या कम्पार्टमेंट नंबर 524 मध्ये मंगळवारी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान भगवानपूर येथे घडली. human-wildlife conflict in Maharashtra
मृतक महिला चिरोली येथील रहिवासी असून संजिवनी संजय मॅकलवार वय 45 असे तिचे नाव आहे. मृतक महिलेसोबत तिचा पती संजय आणि टोलवाही येथील नातेवाईक कवडू बोमनवार,शांताबाई कवडू बोमनवार हे चार जण होते. चौघेही सकाळीच भगवानपूर येथील जंगलात गेले होते.बांबूच्या बारीक काडया,सरपण आणि कुडयाची फुले आणण्याचा त्यांचा उददेश होता. चिरोली,टोलेवाही पासून तीन चार किमी अंतरावर भगवानपूरचे वनविकास महामंडळाचे जंगल आहे.
वाळू घाटावर अल्पवयीन मुलाचा मृत्यू, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पण…
त्याठिकाणी झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने संजिवनीवर हल्ला करून जागीच ठार केले.संजिवनीला फरफटत नेत असताना सोबत असलेल्या नातेवाईकांनी आणि पतीने आरडा ओरड करून वाघाला हुसकावून लावले. तो पर्यंत वाघाच्या हल्ल्यात संजिवनी गतप्राण झाली होती.
ही घटना गावात माहित होताच वनविकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी.बोथे,वनपाल शिंदे, कर्मचारी गव्हारे,अशोक सिंघण, टोलेवाही येथिल पोलिस पाटिल संगिता चल्लावार,चिरोली येथील पोलिस पाटिल गोकूळ मोहूर्ले,चिरोली येथील वनरक्षक सविता गेडाम,प्राणीमित्र उमेश झिरे आणि मूल येथील प्रभारी पोलिस निरिक्षक सुबोध वंजारी घटनास्थळी दाखल झाले. recent tiger attacks in India 2025
दहशतीचे वातावरण
घटनेचा मोका पंचनामा करून मृतदेह मूल येथिल उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेेदनासाठी आणण्यात आला. या घटनेने चिरोली,टोलेवाही,भगवानपूर येथे खळबळ उडाली.परिसरातील शेतकर,शेतमजूर आणि गुराख्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण
मूल तालुक्यातील वाघाच्या हल्ल्यातील मे महिण्यातील ही सहावी घटना आहे.चंद्रपूर जिल्हयातील 17 दिवसातील ही ११ घटना आहे.वाघाच्या वाढत्या हल्ल्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचत आहे.खरीप हंगाम तोंडावर असताना वाघाच्या वाढत्या हल्ल्यामुळे शेतकरी वर्गांमध्ये मोठे चिंतेचे वातावरण आहे.
५ महिन्यात २३ नागरिकांचा मृत्यू
२०२५ या वर्षाच्या सुरुवातीपासून चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्षाची सुरुवात झाली, ५ महिन्यात तब्बल २३ नागरिकांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे, तर मे महिन्यात ११ नागरिकांची वाघाने शिकार केली, वनविभाग मार्फत वाघाच्या वाढत्या हल्ल्यांवर अजूनही काही ठोस उपायोजना करण्यात आल्या नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.
