tiger cub captured by forest officials । सिंदेवाहीत पुन्हा एकदा वनविभागाचे यश; वाघिणीचा बछडा पकडला

tiger cub captured by forest officials

tiger cub captured by forest officials : सिंदेवाही – १० मे रोजी सिंदेवाही तालुक्यातील मेंढा माल या गावातील काही महिला सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र डोंगरगाव मध्ये तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेल्या असता त्याठिकाणी वाघीण व तिच्या ३ बछड्यानी महिलांवर हल्ला केला या हल्ल्यात ३ महिलांचा जागीच मृत्यू झाला होता. देशात प्रथमच अशी घटना घडल्यावर वनविभाग खळबळून जागा झाला आणि वाघीण व तिच्या बछड्यांची शोधमोहीम सुरु केली. १३ मे रोजी वाघिणीला वनविभागाने जेरबंद केले होते. आज १६ मे रोजी वाघिणीच्या बछड्याला वनविभागाने जेरबंद करण्यास यश मिळविले. rescue of tiger cubs after attack

चंद्रपूर शहरातील ओसाड मैदान बनलं ड्रग्सचा अड्डा

वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू

१० मे रोजी सिंदेवाही तालुक्यात तेंदूपत्ता गोळा करण्याकरिता जंगलात गेलेल्या महिलांवर वाघाचा हल्ला झाला या हल्ल्यात ६६ वर्षीय कांताबाई बुधाजी चौधरी, ३० वर्षीय शुभांगी मनोज चौधरी व ४९ वर्षीय सारिका शालिक शेंडे यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर वनविभागाने वाघीण व बछड्याचा शोधासाठी कॅमेरा ट्रॅप व लाईव्ह कॅमेरा घटनास्थळी लावण्यात आले.

६४ कॅमेरा ट्रॅप

वाघाच्या शोधासाठी ६२ वन कर्मचारी, ६४ कॅमेरा ट्रॅप व ८ लाईव्ह कॅमेरे लावण्यात आले. १३ मे ला वाघिणीला वनविभागाने जेरबंद केले, सदर वाघिणीची उत्तरीय तपासणी करून WRTC गोरेवाडा येथे पाठविण्यात आले. तर १६ मे ला डोंगरगाव नियतक्षेत्र कक्ष क्रमांक १३६० मध्ये वाघिणीच्या नर बछड्याला पोलीस दलातील शुटर अजय मराठे यांनी डार्ट करून बेशुद्ध केले. सदर बछड्याची उत्तरीय तपासणी सुरु आहे. tigress and cubs captured by forest department

Powered by myUpchar

सदर सिंदेवाही वनक्षेत्रात इतर बछड्याचा शोध वनविभागाद्वारे सुरु आहे, सदरची यशस्वी कारवाई राकेश सेपट, एमबी चोपडे, डॉ. रविकांत खोब्रागडे, राकेश आहुजा यांच्या मार्गदर्शनात सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांच्या नेतृत्वात एनटी गडपायले, पीएस मानकर, केडी मसराम, चिकाटे, वायएम चौके, सचिन चौधरी यांनी केली.

Leave a Comment