Unidentified Man Found Dead
Unidentified Man Found Dead : चंद्रपूर, दि. 18 मे 2025: महाकाली मंदिर परिसरातील भैरवनाथ मंदिराजवळ दिनांक 18 मे 2025 रोजी दुपारी 2:00 वाजता एक अज्ञात व्यक्ती (वय अंदाजे 40 वर्ष) बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी त्याच्याजवळील सामानाची तपासणी केली असता, कोणतेही ओळखपत्र आढळून आले नाही. त्याला तातडीने चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
अल्पवयीन बालकाला दुचाकी चोरी प्रकरणी घेतले ताब्यात
मृतकाचे वर्णन:
- वय: अंदाजे 40 वर्ष
- उंची: 166 सेंटीमीटर
- रंग: काळा सावळा
- वस्त्र परिधान: चौकडीचा फुल शर्ट, गळ्यात पांढरा दुपट्टा, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट
- विशेष ओळख: हातात स्टीलचे कडे, उजव्या हातावर कन्नड किंवा ओडिया भाषेत लेखन आणि ओम गोंदलेले, डाव्या हातावर डिझाईन गोंदलेले
सदर मृतकाचे प्रेत सध्या चंद्रपूर येथील सरकारी रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी मृतकाच्या नातेवाइकांचा शोध घेण्यासाठी सर्वसामान्यांना आवाहन केले आहे. यासंदर्भात कोणतीही माहिती असल्यास कृपया खालील पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा:
- पीएसआय विजय मुके: मोबाईल क्र. 9923401065
- पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके: मोबाईल क्र. 9767103829