Wainganga river drowning accident । शिक्षणाच्या प्रवासात काळाने घेतली परीक्षा; तीन MBBS विद्यार्थी कायमचे हरपले

Wainganga river drowning accident

Wainganga river drowning accident : सावली : व्याहाड बुज जवळील वैनगंगा नदीत गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तीनही एमबीबीएस विद्यार्थ्यांचे मृतदेह रविवारी बाहेर काढण्यात आले. गोपाल गणेश साखरे, रा. चिखली, स्वप्निल उद्धवसिंग शिरे (२०), छत्रपती संभाजीनगर, पार्थ बाळासाहेब जाधव (२०) रा. शिर्डी अशी मृतकांची नावे आहेत. तिघेही एमबीबीएस प्रथम वर्षाचे विद्यार्थी होते. tragic news about medical college students

व्हॉलीबॉल काढायला गेले आणि….


गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वर्गमित्र वैनगंगा नदीजवळ शनिवारी व्हॉलिबॉल खेळायला गेले होते. बॉल नदीत गेल्याने काढण्यासाठी गेले असता एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात तिघेजण बुडाले. रविवारी शोधमोहीम सुरू करण्यात आली. त्यानंंतर गोपाल साखरे, स्वप्निल शिरे व पार्थ जाधव यांचा मृतदेह डोहातून बाहेर काढण्यात आला. उत्तरीय तपासणी करून तिघांचेही मृतदेह कुटुंबीयांकडे सुपुर्द करण्यात आले.

चंद्रपूर जिल्ह्यात २ दिवसात ४ महिलांची वाघाने केली शिकार

वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. अजय चंदनवाले, विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. राकेश वाघमारे, नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, गडचिरोलीचे उपजिल्हाधिकारी रंजीत यादव आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

विशेष बाब म्हणजे या वर्षातील २६ फेब्रुवारी महाशिवरात्रीला चंद्रपुरातील ३ सख्ख्या बहिणींचा याच ठिकाणी बुडून मृत्यू झाला होता, २ महिन्यांनंतर पुन्हा ३ भावी डॉक्टर तरुणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!