Western Coalfields Limited tourism
सावनेरच्या धर्तीवर चंद्रपुरात भूमिगत खान पर्यटन सुरु करणार – आ. किशोर जोरगेवार
Western Coalfields Limited tourism : सावनेर नागपूर येथील भूमिगत कोळसा खाण पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. याच धर्तीवर चंद्रपूर येथील बंद पडलेली महाकाली कॉलरी भूमिगत खाण देखील पर्यटनासाठी खुली व्हावी, यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी महत्त्वपूर्ण बैठक घेऊन पुढाकार घेतला आहे. नागपूरच्या सावनेर विश्रामगृह येथे वेकोलि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ही बैठक पार पडली. underground coal mine tourism India
चंद्रपुरात मध्यरात्री वाळू माफियांचा नाईट प्लॅन
यावेळी चंद्रपूर वेकोलि क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक दातार, चंद्रपूर वेकोलिचे प्रबंधक विनोद शेंडे, संजय रेड्डी, सावनेर चे उपक्षेत्रीय प्रबंधक सोहन डेहरिया, सावनेर चे उपक्षेत्रीय कार्मिक प्रबंधक पी. सुभाष, एकोपार्क चे चिप मॅनेजर रुपराव महाजन, अभियंता तपास बनर्जी, राकेश निखारिया यांच्या सह भारतीय जनता पार्टीचे माझी शहर अध्यक्ष दशरथ सिंह ठाकूर, भाजप नेते प्रकाश देवतळे, अजय जयस्वाल, तुषार सोम, नामदेव डाहुले, माजी नगर सेवक सुभाष कासनगोट्टूवार, प्रदीप किरमे, रवी गुरुनुले, अमोल शेंडे, राकेश पिंपळकर, संजय तिवारी, नकुल वासमावर, करण नायर, कार्तिक बोरेवार आदींची उपस्थिती होती.
या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी नागपूर सावनेर येथील भूमिगत खाण पर्यटन प्रकल्पाची सविस्तर माहिती घेतली. पर्यटकांना खाणीत प्रवेश देताना कोणत्या सुविधा उपलब्ध केल्या जातात, सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणती उपाययोजना करण्यात आली आहे, आणि या उपक्रमाचा स्थानिक स्तरावर कसा सकारात्मक परिणाम होत आहे, याचा सखोल आढावा या बैठकीत घेण्यात आला. Western Coalfields Limited tourism
महाकाली कॉलरी भूमिगत खाण पर्यटनासाठी खुली करावी
बैठकीनंतर आमदार जोरगेवार यांनी प्रत्यक्ष खाणीत जाऊन खाण पर्यटनाचा अनुभव घेतला. त्यांनी खाणीत तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शन सुविधा, पर्यटकांसाठी लावण्यात आलेले माहिती फलक, प्रकाशयोजना आणि गाईड सेवा यांची बारकाईने पाहणी केली. महाकाली कॉलरी भूमिगत खाण पर्यटनासाठी खुली करावी (Mahakali Colliery tourism project) यासाठी प्रस्ताव तयार करून लवकरात लवकर सादर करावा, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. पर्यटकांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक महत्त्व देत प्रकल्पाची अंमलबजावणीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

यावेळी आमदार जोरगेवार यांनी सांगितले की, “आपण चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत. महाकाली कॉलरीसारख्या प्रकल्पामुळे केवळ चंद्रपूरच्या पर्यटनाला चालना मिळणार नाही, तर येथील नागरिकांना रोजगाराची नवी दारेही उघडतील. लवकरच आपण महाराष्ट्र आणि केंद्रीय पर्यटन मंत्री यांच्याकडे या प्रकल्पाचा प्रस्ताव मांडून या उपक्रमाला मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
इको पार्क ची पाहणी
आमदार जोरगेवार यांनी यावेळी सावनेर इको पार्कचीही पाहणी केली. त्यांनी इको पार्कमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांचा आढावा घेतला आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी करण्यात आलेल्या कामांची माहिती घेतली. इको पार्कमधील हरित परिसर, सायकल ट्रॅक, निसर्गसंपन्नता यांचे कौतुक करत त्यांनी असे उपक्रम चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवरही राबवण्याची गरज व्यक्त केली. इको पार्कमधील व्यवस्थापन, देखभाल आणि स्वच्छतेच्या बाबींचेही निरीक्षण यावेळी त्यांनी केले.
