woman attacked for mangalsutra in Maharashtra
woman attacked for mangalsutra in Maharashtra : चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील मोरवाही मध्ये वृद्ध महिलेला मारहाण करीत ४० हजारांचा माल अज्ञातांनी चोरून नेला होता, याबाबत पोलिसात तक्रार झाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेने तपास करीत दोन आरोपीना अटक केली आहे.
राजू रेड्डी गोळीबार प्रकरणी पोलिसांचा अहवाल
घटना काय?
२० मे रोजी ६५ वर्षीय वृद्ध महिला धृपताबाई प्रल्हाद रायपुरे या घरी झोपेत असताना मध्यरात्री सुमारे १ वाजता दोघांनी घरात प्रवेश करीत महिलेच्या तोंडावर हाताबुक्क्यांनी व काठीने मारहाण करीत जखमी केले व त्या महिलेच्या गळ्यातील ४ ग्राम सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. youth arrested for gold chain robbery
सदर प्रकरणी धृपताबाई यांनी मूल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली, पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत स्थानिक गुन्हे शाखेने कौशल्यपूर्ण व तांत्रिक तपास करीत २२ वर्षीय प्रनिकेत दिलीप शेंडे व १९ वर्षीय तनिष्क ओम मंडलेकर दोघे राहणार ताडाळा रोड वॉर्ड क्रमांक ११ यांना ताब्यात घेत विचारपूस केली असता दोघांनी सदर गुन्हयाची कबुली दिली.
मध्यप्रदेशात केली मंगळसूत्राची विक्री
या गुन्ह्यात दोघांचा साथीदार नयन रामटेके यांच्यासह मिळून हा गुन्हा केला असे दोघांनी सांगितले, चोरीचे मंगळसूत्र मध्यप्रदेश राज्यातील नयनपूर येथे विकल्याचे सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेने दोन्ही आरोपीना अटक करीत मूल पोलिसांच्या हवाली केले. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे. नयन रामटेके याचा पोलीस शोध घेत आहे. Chandrapur local crime update
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी धनराज करकाडे, सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, चेतन गज्जलवार, प्रशांत नागोसे, प्रफुल गारघाटे, किशोर वाकाटे व शशांक बदामवार यांनी केली.