Amma Ki Padhai education initiative । ‘अम्मा की पढ़ाई’ – गरीब विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना मिळाली नवी दिशा!

Amma Ki Padhai education initiative

अम्मा की पढाई – विद्यार्थ्यांना फक्त अभ्यास नव्हे तर भविष्याचं स्वप्न देणारा उपक्रम – आ. किशोर जोरगेवार

Amma Ki Padhai education initiative : चंद्रपूर – आज या सभागृहात बसलेल्या प्रत्येक चेहऱ्यावर उत्सुकता, आत्मविश्वास आणि एक वेगळी चमक दिसते आहे. ही केवळ एका चाचणीची मुलाखत नव्हे, ही भविष्यातल्या उज्वल वाटचालीची सुरूवात आहे. ‘अम्मा की पढ़ाई’ या उपक्रमाची कल्पना मनात आली, तेव्हा एकच गोष्ट विचारात घेतली  आपल्याला केवळ अभ्यासासाठी संधी देणं पुरेसं नाही, तर त्या संधीला स्वप्नांची दिशा देणं तितकेच महत्त्वाचे आहे. ‘अम्मा की पढ़ाई’ हा उपक्रम विद्यार्थ्यांना फक्त अभ्यास नव्हे, तर भविष्याचं स्वप्न देणारा उपक्रम ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. free coaching schemes for poor students

चंद्रपूर शहरात जड वाहनांना नो एंट्री?

आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून ‘अम्मा की पढ़ाई’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. चाचणी परीक्षेतून तीन हजार विद्यार्थ्यांपैकी ३०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. आज, रविवारी आंबेडकर महाविद्यालयात सदर विद्यार्थ्यांच्या मुलाखत सत्राचे आयोजन करण्यात आले होते. coaching classes for economically weaker students

यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी ‘अम्मा की पढ़ाई’ ट्रस्टचे उपाध्यक्ष निवृत्त प्रा. संजय बेले, सचिव सुमीत बेले, सहसचिव अ‍ॅड. राहुल घोटेकर, कोषाध्यक्ष पोलीस उपनिरीक्षक अनिल देरकर, विश्वस्त नायब तहसीलदार प्रतीक बोर्डे, राज्यकर निरीक्षक निलेश मालेकर, पोलीस उपनिरीक्षक अंजली सुमीत बेले, अजय जयसवाल, प्रसाद जोरगेवार, भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, दशरथसिंह ठाकूर, माजी नगरसेवक प्रदीप किरमे, देवानंद वाढई, राजेंद्र अडपेवार, पवन सराफ आदींची उपस्थिती होती.

free coaching schemes for poor students

यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, आजची पिढी ही शिक्षणाच्या बाबतीत एका स्पर्धात्मक युगात आहे. आपल्या या उपक्रमात ३०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. पण ज्यांची निवड झाली नाही, ते सुद्धा विजेते आहेत. तुम्ही तुमच्या आतल्या इच्छाशक्तीला जाग दिलं आहे, हेच खरं यशाचं बीज आहे. येथे दरमहा उत्तम मार्गदर्शक आणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहोत. त्यात निवड न झालेले विद्यार्थीसुद्धा सहभागी होऊ शकतात.

अम्मा की पढ़ाई म्हणजे आईच्या मायेचा, त्यागाचा आणि शिक्षणाच्या महत्त्वाचा संगम आहे. हा उपक्रम फक्त पुस्तकी ज्ञानापुरता मर्यादित नाही, तर स्वप्न बघायला शिकवणारी, स्वप्नांसाठी झगडायला शिकवणारी आणि त्या स्वप्नांना वास्तवात उतरवायला शिकवणारी मोहिम आहे. आपण एका नव्या शिक्षण संस्कृतीची पायाभरणी करत आहोत, जिथे विद्यार्थी आपले कर्तृत्व दाखवतील, देशाच्या विकासात मोलाचा वाटा उचलतील, असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. यावेळी शेकडो विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. education empowerment programs for backward class

शिक्षण अपुरं राहिल्याचं दुःख – आ. जोरगेवार

दहावी उत्तीर्ण केल्यानंतर अकरावीत प्रवेश घेतला होता, पण आर्थिक अडचणींमुळे शिक्षण पूर्ण करता आलं नाही. आज माझ्या नावासमोर ‘शिक्षण – अपुरं’ असा कॉलम उरतो आणि ते दुःख आजही मनाला सलतं, अशा भावनिक शब्दांत आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या मनातील वेदना मांडल्या.

पुढे परिस्थिती बदलली, शिक्षण पुन्हा घेता आलं असतं. पण मी मुद्दाम शिक्षण घेणं टाळलं. कारण अपूर्ण राहिलेल्या शिक्षणाच्या अनुभवातूनच गरीब व होतकरू विद्यार्थ्यांचं दुःख अधिक समजू शकलो. त्यांच्या वेदना माझ्या स्वतःच्या झाल्या. आणि म्हणूनच या उपक्रमाची संकल्पना पुढे आली, असंही त्यांनी स्पष्ट केलं. Amma Ki Padhai education initiative

आमचं स्वप्न अपुरं राहिलं, पण तुमचं स्वप्न आम्ही अपूर्ण होऊ देणार नाही. परिस्थितीमुळे कुणाचं ‘अधिकारी’ बनण्याचं स्वप्न थांबू नये, म्हणून ‘अम्मा की पढ़ाई’ उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमातून पात्र विद्यार्थ्यांना संधी दिली जाईल, मार्गदर्शन दिलं जाईल आणि त्यांना आयुष्यात उभं करण्यासाठी संपूर्ण पाठबळ दिलं जाईल,असा विश्वासही आमदार जोरगेवार यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Comment