Bhadravati Rape Case । धक्कादायक! चंद्रपूरमध्ये १४ वर्षीय मुलीवर अत्याचार

Bhadravati Rape Case

Bhadravati Rape Case : चंद्रपूर : शहरातील एका बेघर वस्तीतील तरुणाने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही संतापजनक घटना शुक्रवार, १३ जून रोजी दुपारी १ ते १:३० वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत जुना सुमठाणा येथील रहिवासी असलेल्या सलीम मुलखा सैय्यद (३०) या आरोपीला अटक केली आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. Protect Children

रात्री चोरी आणि सकाळी अटक, भद्रावती पोलिसांची जलद कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार, १३ जून रोजी दुपारी सुमारे १ ते १.३० वाजण्याच्या दरम्यान आरोपी सलीम सैय्यद पीडित मुलीच्या घरी गेला. त्याने मुलीला, “तुझ्या आईने तुला माझ्या घरी बोलावले आहे,” असे खोटे सांगितले आणि तिला आपल्या घरी घेऊन गेला. आरोपीने घरात प्रवेश करताच दरवाजा आतून बंद करून घेतला आणि अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने दुराचार केला.

आरोपीला तात्काळ ठोकल्या बेड्या

या धक्कादायक घटनेनंतर पीडित मुलीने तातडीने आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला. मुलीच्या आईने या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवत त्याच रात्री ९ वाजता आरोपी सलीम सैय्यदला बेड्या ठोकल्या. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या प्रकरणाचा पुढील तपास वरोरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) नयोमी साटम करत आहेत.

Leave a Comment