eid celebration with politicians । ईद-उल-अजहा (बकरी ईद) निमित्त लष्करी ईदगाह कमेटीच्या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांची उपस्थिती

eid celebration with politicians

eid celebration with politicians : चंद्रपूर – आज चंद्रपूर जिल्ह्यात ईद-उल-अजहा (बकरी ईद) हा पवित्र सण मुस्लिम बांधवांकडून मोठ्या श्रद्धा, एकता आणि उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त लष्करी ईदगाह कमेटी तर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

तुकूम अपघात प्रकरणातील आरोपी चालक सहित मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

यावेळी अनवर खान, साबिर सर, जहिर काजी, इजहार काजी, अफिसुर रहमान, राशिद हुसेन, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, पोलिस उपविभागीय अधिकारी सुधारकर यादव, शांतता समितीचे रमजान अली घायल, खत्री, इमरान शेख, सय्यद अबरार व मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती.

political leaders on eid festival

यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी ईदगाहमध्ये येणाऱ्या मुस्लिम बांधवांना गुलाबाचे फूल देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमादरम्यान लष्करी ईदगाह कमेटीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांचे स्वागत केले.

ईद-उल-अजहा हा सण त्याग, समर्पण आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहे. विविध धर्मांचे, संस्कृतींचे लोक जेव्हा एकत्र येतात, तेव्हाच खऱ्या अर्थाने ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही संकल्पना साकार होते, असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

Leave a Comment