Mahadbt Portal Scholarship Revert Process । ❗ ‘Right to Give Up’ निवडली का? आता करा अर्ज Revert – शेवटची संधी!

Mahadbt Portal Scholarship Revert Process

Mahadbt Portal Scholarship Revert Process : चंद्रपूर – महाडीबीटी पोर्टलवरील राईट टू गिव्ह अप, या पर्यायाचे बटण नजरचुकीने अथवा अनावधानाने निवडलेल्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज, महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने सामान्य प्रशासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने सामाजिक न्याय विभागास अवगत केले आहे. how to edit submitted application in mahadbt portal

या पर्यायाचा करा वापर

        शैक्षणिक वर्ष 2023-24 आणि 2024-25 मधील जिल्ह्यातील अनुसुचित जाती प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांकडून पोर्टलवर नजर चुकीने अथवा  अनावधानाने RIGHT TO GIVE UP पर्याय निवडला गेला आहे, अशा विद्यार्थ्यांनी  महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधून महाविद्यालयांच्या प्राचार्य लॉगीन मधून REVERT RIGHT TO GIVE UP APPLICATION" या पर्यायाचा वापर करून आपला अर्ज 30 जून 2025 पूर्वी Revert back करून घेणे आवश्यक आहे. तसेच Revert back झालेला अर्ज  देखील विहीत वेळेत म्हणजेच 30 जूनपुर्वी विद्यार्थ्यांने त्याच्या लॉगीनमधून ऑनलाईन रित्याच फेरसादर करणे आवश्यक राहील.

१ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठयपुस्तके

विहीत वेळेत विद्यार्थ्यांने अर्ज फेरसादर न केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थी अथवा संबंधित महाविद्यालयाची राहील. सदर तांत्रिक अडचणीमुळे जिल्ह्यातील कोणतेही विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार नाही, या उद्देशाने राज्य शासनामार्फत देण्यात आलेल्या अंतिम संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन त्रुटीत असलेले अर्ज तात्काळ निकाली काढावी.

याबाबत महाविद्यालयांचे व्हॉटस्अप ग्रुप व तत्सम इतर समाज माध्यमातून देखील सदर सुविधेबाबतची माहिती विद्यार्थी, त्यांच्या पालकांपर्यंत तात्काळ पोहचवावी. आवश्यकता असल्यास महाविद्यालय स्तरावरुन विद्यार्थ्यांची बैठक/ कार्यशाळा घेण्यात यावी. जेणेकरून अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार नाहीत, असे आवाहन सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी केले आहे.

Leave a Comment