MLA action on pending salary of teachers | आमदार अडबाले यांनी प्रकल्‍प कार्यालयातील अधिकाऱ्यांना धरले धारेवर

MLA action on pending salary of teachers

MLA action on pending salary of teachers : चंद्रपूर : एकात्‍मिक आदिवासी विकास प्रकल्‍प कार्यालय चंद्रपूर येथील अधिकारी – कर्मचारी आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्‍या प्रलंबित ठेवत असल्‍याने समस्‍या निवारण सभेत आमदार सुधाकर अडबाले यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. प्रलंबित समस्‍या दिलेल्‍या वेळेत सोडविण्याचे निर्देश देखील सभेत आमदार अडबाले यांनी दिले. tribal school teacher salary revision

बल्लारपूर ते थेट सोलापूर नव्या रेल्वेची होणार सुरुवात? खासदार धानोरकरांचा पुढाकार

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा “समस्या तुमच्या, पुढाकार आमचा” या उपक्रमा अंतर्गत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने चंद्रपूर प्रकल्पांतर्गत अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्‍यांबाबत समस्‍या निवारण सभा नुकतीच पार पडली.

लेखाधिकारी यांना धरले धारेवर

आदिवासी आश्रमशाळा माध्यमिक शिक्षकांना ४८०० ग्रेड पे नुसार वेतन निश्‍चिती केल्‍यानंतरही सुधारित वेतन निश्‍चिती लागू केली नसल्‍याने सभेत लेखाधिकारी यांना आमदार सुधाकर अडबाले यांनी धारेवर धरले. वर्ष होऊनही देखील सदर प्रकरण निकाली न काढल्‍याने सदर मुद्दा सभेत चांगलाच गाजला. तसेच प्राथमिक शिक्षकांना ४३०० सुधारित वेतन निश्‍चिती लागू करावी. सदर प्रकरण ११ जुलै २०२५ पर्यंत निकाली काढण्याचे निर्देश आमदार सुधाकर अडबाले यांनी अधिकाऱ्यांना दिले. pending salary issues in government schools

शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या जीपीएएफ – एनपीएस २०२३-२४, २०२४-२५ पर्यंतच्या पावत्‍या ३० सप्‍टेंबर २०२५ पर्यंत द्याव्‍या. दरमहा १ तारखेला वेतन अदा करण्याबाबत सभेत ठरलेल्‍या वेळापत्रकानुसार कार्यवाही करावी व प्रलंबित सामुहीक, वैयक्तिक समस्‍यांवर चर्चा करून समस्‍या तात्‍काळ निकाली काढण्याच्या सूचना आमदार सुधाकर अडबाले यांनी प्रकल्‍प कार्यालयातील प्रकल्‍प अधिकारी, लेखाधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्‍या.

सभेला प्रकल्‍प अधिकारी विकास राचेलवार, सहाय्यक प्रकल्‍प अधिकारी श्री. टिंगूसले, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे महानगर अध्यक्ष दिगांबर कुरेकार, माजी जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे, माजी जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे, सिटू संघटनेचे विभागीय अध्यक्ष रामदास खवशी, अनुदानित / शासकीय आदिवासी आश्रमशाळा संघटना चंद्रपूरचे अध्यक्ष प्रमोद साळवे, सचिव मनोज आत्राम, कार्याध्यक्ष चंद्रभान वरारकर, सदस्‍य बजरंग जेणेकर, महेश ताजणे, सुरेश वरारकर, गोपाल बोबाटे, युवराज मेश्राम, विलास चुदरी, छाया मोहीतकर, कु. जे.डी. राऊत, सुधाकर वाढोरे, श्री. काकडे, श्री. पिंपळशेंडे, श्री. खोब्रागडे, श्री. धानोरकर, श्री. बोधलकर, श्री. कसारे, श्री. कडू व इतर आश्रमशाळा पदाधिकारी, समस्याग्रस्‍त शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment