Sudhakar Adbale teachers problem resolution
Sudhakar Adbale teachers problem resolution : चंद्रपूर : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा “समस्या तुमच्या, पुढाकार आमचा” या उपक्रमा अंतर्गत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय सरकार्यवाह तथा शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले यांच्या मार्गदर्शनाखाली तथा म. रा.मा.शि. महामंडळ मुंबई सहकार्यवाह जगदीश जुनगरी यांचे प्रमुख उपस्थितीत इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत आश्रमशाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या निवारणार्थ सभा दि. १३ जून २०२५ रोजी इतर मागास बहुजन कल्याण विभाग चंद्रपूरच्या सहाय्यक संचालक श्रीमती आशा कवाडे यांचे कार्यालयात पार पडली. सभेकरिता प्रादेशिक उपसंचालक विजय वाकुलकर नागपूर हे सुद्धा उपस्थित होते. Vidarbha secondary teachers association meeting
सिंदेवाही तालुक्यात हत्ती ने वृद्धाला चिरडले
इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा शासन निर्णय दिनांक ४ जून २०२५ नुसार विजाभज आश्रमशाळेतील पात्र शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना एकस्तर पदोन्नती लाभ मंजूर करून सन २०२० पासून बंद असलेला प्रोत्साहन भत्ता वेतनात सुरू करून प्रलंबित थकबाकी तात्काळ अदा करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित करणे, जिल्ह्याबाहेर झालेले प्राथमिक शिक्षकांचे समायोजन रद्द करून दिनांक १२ जुलै २०१९ च्या शासन परिपत्रकानुसार जिल्ह्यातच प्राथमिक/ माध्यमिक आश्रमशाळेतील रिक्त जागांवर करणे, प्रलंबित भ.नि.नि. / डिसीपीएस हिशोबचिठ्या तात्काळ वितरित करणे, कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती, वरिष्ठ/निवड श्रेणी, वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रस्ताव, निवृत्ती वेतन प्रस्ताव सेवा हमी कायद्यानुसार ४५ दिवसांच्या आत मार्गी लावणे, Ashram school teacher pension allowance pending Maharashtra
शिक्षकांच्या विविध समस्यांवर चर्चा
जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांची सेवापुस्तस्के अद्ययावत करून पडताळणी करून घेणे, माहे जानेवारी २५ पासून प्रलंबित १% घरभाडे भत्ता फरक तात्काळ अदा करणे, शासननिर्णय ३१ मे, २०२४ नुसार पुढील संचमान्यता करतांना सरल पोर्टलवरील आधार प्रमाणित विद्यार्थी ग्राह्य धरणे व खुल्या प्रवर्गातील शिक्षक रविंद्र ठमके यांचे आरक्षित जागेवर झालेले नियमबाह्य समायोजन तात्काळ रद्द करण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसह अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. बहुतांश उपस्थित समस्याग्रस्तांचे प्रस्ताव सभेच्या दिवशीच निकाली काढण्यात आले. सर्व प्रलंबित समस्या तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश आमदार सुधाकर अडबाले यांनी सहाय्यक संचालकांना दिले आहे.
सदर समस्या निवारण सभेकरिता विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील शेरकी, जिल्हा कार्यवाह दीपक धोपटे, महानगर कार्यवाह सुरेंद्र अडबाले, माजी कार्याध्यक्ष लक्ष्मणराव धोबे, उपाध्यक्ष आनंद चलाख, आश्रमशाळा विभागाचे जिल्हा कार्यवाह किशोर नगराळे, जिल्हाध्यक्ष दिनेश चौधरी, आदिवासी आश्रमशाळा जिल्हाध्यक्ष प्रमोद साळवे तथा संघटनेचे पदाधिकारी, केशवराव ठाकरे, पद्माकर वनकर, वसंत कोंडेकर, संतोष टोंगे, नवनाथ वरारकर, अनिल लांजेकर व इतर आश्रमशाळा पदाधिकारी, समस्याग्रस्त शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
