The crime of culpable homicide
मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत मृतक व जखमीला आर्थिक मदत द्या – रोहिणी पाटील
The crime of culpable homicide : चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील तुकूम येथे २ जून रोजी अनियंत्रित हायवा ट्र्क ने वाहनांना धडक देत २ तरुणींना चिरडले यामध्ये एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाली. या दुर्दैवी घटनेनंतर सुद्धा हायवा ट्र्क चालक व मालकावर अजूनही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही, यावर चंद्रपूर युवतीसेनेने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली. ubt yuvatisena
पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी ग्रामीण भागातून सानिका कुमरे व काजल आत्राम या चंद्रपूरमध्ये राहत होत्या, २ जून रोजी अभ्यासिकेतून परत जाताना तुकूम येथे सानिका कुमरे ला हायवा ट्रक ने चिरडले. या अपघातात सानिका जागीच ठार झाली तर काजल गंभीर जखमी झाली होती. पोलीस बनण्याचे स्वप्न बघणाऱ्या दोन्ही तरुणींचे स्वप्न धुळीस मिळाले. यावर ठाकरे गट शिवसेना युवासेनेच्या सहसचिव व युवती सेना जिल्हाधिकारी रोहिणीताई पाटील यांनी याबाबत जखमी काजल आत्राम ची भेट घेत तिला धीर दिला. culpable homicide accidental death
ठोस पुरावे तरीपण कारवाई नाही, आप ने दिला आंदोलनाचा इशारा
युवतीसेना ने घेतला पुढाकार
६ जून रोजी रोहिणी पाटील यांनी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची भेट घेत या घटनेला जबाबदार ट्रक चालक व मालक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. घटनेला जबाबदार ट्र्क चालकावर दारूचे गुन्हे दाखल असल्याची माहिती सुद्धा पोलीस अधीक्षकांना दिली, जर घटनेच्या वेळी चालकाला फिट आली होती तर अनफिट चालकाला कामावर ठेवणाऱ्या मालकावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी मागणी पाटील यांनी यावेळी केली. यावर पोलीस अधीक्षकांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिले. news chandrapur
जिल्हाधिकारी विनय गौडा यांची रोहिणी पाटील यांनी भेट घेत मृतक सानिका कुमरे व जखमी काजल आत्राम यांना मुख्यमंत्री सहायता निधी मार्फत आर्थिक मदत देण्याची मागणी केली. तसेच जखमी काजल आत्राम यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला परंतु तिची चालण्याची सुद्धा परिस्थिती नव्हती ही बाब जिल्हाधिकारी यांच्या समोर मांडली त्यांनी तात्काळ आदिवासी प्रकल्प अधिकारी यांना हॉस्पिटलला जाऊन चौकशी करायला सांगितले. The crime of culpable homicide
प्रोजेक्ट ऑफिसर विकास नक्षलवार यांनी स्वतः जखमी काजल आत्राम यांची परिस्थिती बघितली व त्यांनी हॉस्पिटल मधे डॉक्टरांशी बोलून परत काही दिवस जोपर्यंत ती ठीक होईल तोपर्यंत रुग्णालयात ठेवण्याचे सांगितले .दोघांच्या घरची परिस्थिती हि बेताची आहे. त्यांना लवकरात लवकर मदत मिळावी याकरिता जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी करण्यात आली. गौडा यांनी यावर सकारात्मकता दर्शवित याबाबत लवकर पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.
जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना भेटण्याकरिता गेलेल्या शिष्टमंडळात युवासेना सहसचिव, युवती सेना जिल्हाधिकारी रोहिणीताई पाटील, युवतीसेना उपजिल्हा अधिकारी धनश्री प्रभा हेडाऊ, युवती जिल्हा चिटणीस रोशनी ध्रुव गोलदार, सौरभ बोढे, सानिका फरकडे, पायल लसंते, शिव राठोड, लोचना वेलके, निधी झाडे, कुणाल मासिरकर, अतुल वांढरे, गौरव आव्हडे, अभिषेक त्रिशूले, निलेश वनकर, वैशू दादांजे, साहिल शेख, संदीप राठोड, आतिष टेकाम, सूरज मोरे, मनीष भोयर, संजना पेंदाम, दिलीप आत्राम, मुकेशकुमार इचारवार, गोविंदा मडावी, प्रीती सलाम व काजल वेलादी उपस्थित होते.
“२ जून रोजी तुकूम भागात झालेल्या या दुर्दैवी अपघातात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीला आपला जीव गमवावा लागला, एक तरुणी जखमी झाली मात्र ट्र्क चालक हा राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने त्याला वाचविण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरु झाले. एकही राजकीय पक्ष या घटनेवर स्पष्ट बोलू शकत नाही आहे, कारण राजकीय दबाव, ती गरीबाची लेक होती म्हून तिला न्याय मिळणार नाही का? पोलीस बनण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आता न्यायासाठी मृत्यूनंतर सुद्धा तिला यातना सहन कराव्या लागत आहे. चंद्रपुरातील वातावरण हे गलिच्छ राजकारणामुळे नासून गेले.’
