tiger attack in forest areas
tiger attack in forest areas : मूल (चंद्रपूर) : समाजसेवक बाबा आमटे यांच्या सोमनाथ प्रकल्पात गेल्या ४० वर्षांपासून वास्तव्यात असलेले जयदेव पोतलू करनेकर (६०) रा. विसोरा ता. वडसा जिल्हा गडचिरोली यांना वाघाने ठार केले. ते सोमनाथ प्रकल्पात नेहमीप्रमाणे आंबे तोडण्यासाठी गेले होते. अशातच वाघाने हल्ला चढविल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. सततच्या घटनेने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दुचाकीवर कोसळल झाड, एकाचा मृत्यू, चंद्रपुरातील घटना
जयदेव हे आंबे तोडण्यासाठी सोमनाथ प्रकल्पात रविवारी दुपारी ३ वाजता गेले होते. दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवून ठार केले. घरच्या मंडळींनी जयदेव परत आला नसल्याची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाने शोध घेतला मात्र उपयोग झाला नाही. human wildlife conflict in Maharashtra
जयदेवच्या मृतदेहाचे तुकडे आढळले
सोमवारी सकाळी वाघाने जयदेवला ओढत वन विभाग कक्ष क्रमांक ७९२ येथे नेले होते. सोमवारी सकाळी ८:३० वाजता मूल वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल कारेकर, क्षेत्र सहाय्यक आर.सी. पेदापल्लीवार यांनी कर्मचाऱ्यांना घेवून जंगलात शोध मोहीम सुरू राबविली असता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कक्ष क्रमांक ७९२ जयदेवच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आले.
रात्रभरात वाघाने मृतदेहाचा बराच भाग खाल्ल्याचे दिसून आले. जयदेव हा आपल्या पत्नीसह सोमनाथ प्रकल्पात राहत होता. वनविभागाने मृतकाच्या नातेवाईकाला २० हजार रुपये सानुग्रह म्हणून मदत दिली आहे. वनविभागाने कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. चालू वर्षात वाघाच्या हल्ल्यात आतापर्यन्त एकूण २४ नागरिकांच्या बळी गेला आहे.
