tree fall accident during storm
tree fall accident during storm : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात सध्या सर्वत्र वादळी वारा व पावसाने थैमान घातले आहे, ९ जून रोजी चंद्रपुरात आलेल्या वादळी पावसात धावत्या दुचाकीवर झाड कोसळल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
५२ वर्षीय एकनाथ अनिल कुमरे राहणार नवीन सिनाळा असे मृतकाचे नाव आहे, सायंकाळच्या सुमारास अचानक चंद्रपूरच्या वातावरणात बदल झाला, काही क्षणात वादळी वारा व पाऊस सुरु झाल्याने नागरिकांची पळापळ सुरु झाली.
चंद्रपूर जिल्ह्यात धक्कादायक घटना, मायलेकींचा रस्ते अपघातात मृत्यू
धावत्या दुचाकीवर कोसळले झाड
सुमारे अर्धा तास मुसळधार पाऊस आला, त्यानंतर विजेच्या कडकडाटाने चंद्रपूर हादरले, ऊर्जानगर-दुर्गापूर मार्गावर एकनाथ कुमरे हे आपल्या दुचाकी वाहनाने पावसात ओलेचिंब होत जात होते, पाऊस सुरु असल्याने दुचाकींचा वेग कमी होता मात्र त्याक्षणी एक भलं मोठं झाड कुमरे यांच्या धावत्या दुचाकीवर कोसळले.
झाड कोसळल्याने कुमरे हे मार्गावर कोसळले, त्यांच्या डोक्यावर गंभीर मार लागल्याने कुमरे जागीच गतप्राण झाले, पाऊस व विजेचा कडकडाट असल्याने त्यावेळी मार्गावर वाहनांची वर्दळ कमी होते, काही वेळ कुमरे हे मार्गावर तसेच पडून राहिले, याबाबत दुर्गापूर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ कुमरे यांना रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
