bogus patrakar in chandrapur । 🚨 दारू विक्रेते, मजूर… आता पत्रकार? चंद्रपूरात फेक मीडिया साम्राज्य

bogus patrakar in chandrapur

bogus patrakar in chandrapur : चंद्रपूर – भ्रष्टाचार, घोटाळा व समस्या या विषयांवर लिखाण करणारे अनेक पत्रकार आज पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे, ज्यांच्या लेखनामुळे सामान्य नागरिकांना न्याय मिळतो, लहान समस्या शासन दरबारी पोहचत त्याचं निराकरण होतं असे प्रामाणिक पत्रकार आजही आपलं कार्य चोखपणे पार पाडत आहे. मात्र पत्रकारिता क्षेत्रात अनेक बोगस पत्रकारांचा समावेश झाला आहे. ज्यांना या क्षेत्राचे शून्य ज्ञान आहे ते यामध्ये एंट्री करू पाहत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अश्या भुरट्या पत्रकारांचा सुळसुळाट असून काहींना पोलीस प्रशासनाने अटक केली आहे. खुनाचे गुन्हे, चोरी, विनयभंग दाखल असलेले आज गळ्यात ओळखपत्र टाकून स्वतःला पत्रकार असे सांगत समाजात वावरत आहे.

चंद्रपुरात बनावट ओयो हॉटेल्स

विशेष बाब म्हणजे यांचा उद्देश फक्त लिखाण करायचे नाही मात्र त्यामधून पैसे कमवायचे, नागरिकांना त्रास द्यायचा हे काम बिनधास्तपणे बोगस पत्रकार करीत आहे. काही महिन्यापूर्वी भंडारा जिल्ह्यात रेती घाटावर वसुली करण्याकरिता चंद्रपुरातील बोगस पत्रकार पोहचले, काही नागरिकांनी त्यांची वाट अडवीत व्हिडीओ बनविला होता. चंद्रपूर जिल्हातील समाज माध्यमात सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये दोघेजण कार्यक्र्मावरून भांडत आहे. माझं नाव पत्रिकेत का बरं टाकलं यावरून दोघात वादंग सुरु आहे. police action on bogus media

पत्रकारितेच्या नावावर कार्यक्रम आयोजित करून शासकीय व राजकीय पुढाऱ्यांकडून वसुली करायची हा धंदा या बोगस पत्रकाराद्वारे नित्याने सुरु करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे अवैध दारू विक्रेते, वाळू माफिया, घरकाम करणारे गवंडी, मजूर आपल्या गळ्यात ओळखपत्र टाकत मी पत्रकार असल्याचा भास अधिकारी वर्गाला दाखवीत आहे. सध्या काहीजण पत्रकारिता क्षेत्रात नाव रहावं यासाठी स्वतः लिखाण न करता chatgpt चा वापर करताना दिसतो. fake media agents

नुकतेच चंद्रपूर पोलिसांनी मुलमध्ये बोगस पत्रकारांना अटक केली होती, त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे, बोगस पत्रकारांच्या मागणीला बळी पडायचे नाही असा निर्धार शासकीय वर्गाने केलेला आहे.

‘बोगस पत्रकारांचा गार्ड’

डिजिटल मीडियामध्ये न्यूज पोर्टल सुरु करायचं व आपल्या पोर्टल चे ओळखपत्र वितरित करीत बोगस पत्रकारांची नेमणूक करायची असे प्रकार सध्या चंद्रपुरात सुरु आहे. ओळखपत्रासाठी हजार ते बाराशे रुपये वसूल करायचे. वर्षातून एकदा वर्धापन दिवस साजरा करीत मोठी वसुली करायची. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आमदार, खासदार, पोलीस व जिल्हाधिकारी यांना निमंत्रण द्यायचं इतकं काम दरवर्षी करणे. असले काम बोगस पत्रकारांचा गार्ड करीत आहे. चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी असल्या पत्रकारांवर कठोर कारवाई करावी जेणेकरून अनेक नागरिक त्यांच्या पैश्याच्या मागणीला बळी पडणार नाही. डिजिटल मीडियाचे नियम जरी वाचले तर आज अनेक न्यूज पोर्टल असेच बंद होणार.

Leave a Comment