brahmpuri illegal firearm seizure
brahmpuri illegal firearm seizure : ब्रह्मपुरी – चंद्रपूर जिल्ह्यात अवैध बंदूक कुठून येतात हा सर्वात मोठा अनुत्तरित प्रश्न आहे, बंदूक आणणारा पोलिसांना मिळतो मात्र बंदूक विक्रेता पोलिसांच्या हाती लागत नाही. १९ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २६ वर्षीय युवकांकडून देशी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले.
चंद्रपुरात बोगस ओयो हॉटेलचा पर्दाफाश
ब्रह्मपुरी तालुक्यात अवैध व्यवसाय विरुद्ध कारवाई करीता पेट्रोलिंग करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अवैध शस्त्राबाबत गोपनीय माहिती मिळाली, माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मौजा किन्ही गावात दाखल होत संशयिताच्या घरी छापा टाकला, २६ वर्षीय गणेश उर्फ गोलू बक्षी सोनवणे याच्या ताब्यातील देशी कट्टा सह दोन जिवंत काडतुसे पोलिसांच्या कारवाई दरम्यान आढळले.
दोन आरोपीना अटक
सदर गावठी कट्टा ब्रह्मपुरी तालुक्यातील मालडोंगरी गावात राहणाऱ्या २९ वर्षीय अक्षय भजनदास शेंडे याने गणेश सोनवणे ला दिला असल्याची माहिती गणेश ने पोलिसांना दिली, पोलिसांनी दोन्ही आरोपीना अटक करीत भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३, २५ अनव्ये गुन्हा दाखल करीत ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि संतोष निंभोरकर, पोलीस कर्मचारी सचिन गुरनुले, गणेश भोयर, अजित शेंडे, नितेश महात्मे व मिलिंद जांभुळे यांनी केली.
