National Backward Class Commission hearing । “धरणे आंदोलनाचा परिणाम! आयोग अध्यक्षांनी घेतली चंद्रपूरमध्ये थेट सुनावणी!”

National Backward Class Commission hearing

National Backward Class Commission hearing : चंद्रपूर: दि. 16 जुलै 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन दिवसांपासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनात अरबिंदो इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. टाकळी-जेना-बेलोरा, कर्नाटका पॉवर कार्पोरेशन प्रा.लि. बरांज (मो.) कोळसा खाण, पी.एम. गतिशक्ती अंतर्गत रेल्वे लाईनचे वेकोलि संबंधित प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न व मागण्या या संबंधी धरणे आयोजित केले होते.

फळांच्या बियांनी भरलं चंद्रपुरातील जंगल

या धरणे कार्यक्रमास अधिकांश इतर मागासवर्गीय शेतकऱ्यांची संख्या असल्यामुळे त्यांनी आपल्या मागण्यांची तक्रार राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे केल्यामुळे आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. हंसराजजी अहीर यांनी गंभीरपणे दखल घेवून धरणे स्थळाला प्रत्यक्ष भेट देवून अनेक प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून समस्यांची सुनावणी व नोंदी घेतल्या. backward class commission intervention

शेतकरी व प्रकल्पग्रस्तांवर होत असलेले अन्याय, राज्य सरकारच्या निती धोरणाला डावलून जिल्हा प्रशासन अधिकारी, मायनिंग अधिकारी, भुमी अधिग्रहण अधिकारी, पुनर्वसन, वनविभाग, जिल्हा परिषद, महसुल अधिकारी, रेल्वे अधिकारी, वेकोलि अधिकारी तसेच या संबंधित अधिकारी राज्य शासनाच्या धोरणाच्या विरोधात जावून खासगीकरण व सरकारी कंपनीच्या बाजूने काम करीत असल्याचा आक्षेप प्रकल्पग्रस्तांनी केला.

त्यांच्या तक्रारी नोंदवून झालेल्या अन्यायाची नोंद घेवून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने मागासवर्गीयांना राज्य सरकारकडून नोकरी, वेतन, जमिनीचा मोबदला, गावाचे पुनर्वसन व त्यातील तफावती या सर्वावर आयोगाकडून न्याय मिळेल ही भावना व्यक्त केली. आयोगाने सर्व प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेवून त्यांची व्हिडीओ रेकॉर्डिग घेतली. प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे ऐकून लिखीत स्वरूपात त्याची नोंद घेतली. farmers rights in coal mining project

पहिल्यांदाच अशी सुनावणी

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती तालुक्यातील प्रकल्पग्रस्त असलेल्या धरणे मंडपात राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष मा. हंसराजजी अहीर यांनी आंदोलन स्थळी जावून सुनावणी घेवून एक नविन स्तुत्य उपक्रम केला.

यावेळी वरोराचे आमदार श्री. करण देवतळे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे समक्ष उपस्थित केल्या. यावेळी खुशालजी बोंडे, विजयजी राऊत, अनिलजी फुलझेले, डॉ. अशोकजी जिवतोडे, महानगर अध्यक्ष भाजपा सुभाषजी कासनगोट्टूवार, युवा नेते रघुवीर अहीर, विनोदजी शेरकी, नामदेव डाहुले,स्वप्निल डुकरे यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून प्रकल्पग्रस्तांच्या या आंदोलनाला समर्थन दिले.

या धरणे आंदोलनाच्या यशस्वीतेकरिता श्री. प्रदीप महाकुलकर, श्री. धनंजय पिंपळशेंडे, सुनिल नामोजवार, गोविंदा बिंजवे, रामा मत्ते, गोपाल गोसवाडे, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, विशाल दुधे, संजय वासेकर, शाम महाजन, श्री. विठ्ठल पुनवटकर, विजय वानखेडे, दत्तात्रय गुंडावार, पुनम तिवारी, गौतम यादव, चेतन शिंदे, आशय चंदनखेडे, मयुर भोकरे, राहुल सुर्यवंशी, संजय खनके, संजय रॉय, जमील शेख आदींनी प्रयत्न केले.

Leave a Comment